भारतीय जनता पार्टीला तीन जागी बहुमत मिळवल्याने बिलोलीत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी केली

देशातील पाच राज्यात निवडणूक झाल्या त्यात भारतीय जनता पार्टीला तीन जागी बहुमत मिळवल्याने बिलोलीत भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आतिषबाजी केली.
[ बिलोली ता. प्र – सुनील जेठे ]
देशातील पाच राज्यांमध्ये तीन राज्य राजस्थान , छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात भारतीय जनता पार्टीने बहुसंख्येने जागा मिळवल्या असल्याचे या देशात चित्र स्पष्ट झाले, म्हणून बिलोली तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आनंदाने फटाके फोडून भारतीय जनता पार्टी चा झेंडा झळकत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जय घोषणा दिली.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण राव ठक्करवाड, माजी नगराध्यक्ष यादव रावजी तुडमे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, युवा तालुकाध्यक्ष इंद्रजीत तुडमे, श्रीनिवास पाटील, विजयकुमार कुंचनवार, राहिरे, बाबू कुडके, साईनाथ शिरोळे, आभिजित तुडमे, गोविंद गुडमलवार, यांच्यासह महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी या जल्लोषात दिसून आले.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या