मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते साधुसंतांचा सन्मान !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
साधुसंत येती घरा !!
तोची दिवाळी दसरा !!
राष्ट्रसंत सद्गुरू ष.ब्र.108 डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय महादेव पिंपळगाव पाटी अर्धापूर,नांदेड येथे आयोजित अधिक श्रवणमास अखंड शिवनाम सप्ताहाची निमंत्रण पत्रिका राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे मा.खा.भास्करराव जाधव खतगावकर साहेब यांना गुरुवर्य सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर,गुरुवर्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज हाणेगावकर, गुरुवर्य डॉ.वीरूपक्ष शिवाचार्य महाराज मांजरसुंबेकर, गुरुवर्य डॉ.बसवलिंग शिवाचार्य महाराज कौलासकर यांनी राजेंद्रनगर, नांदेड येथील निवासस्थानी दिली.

मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी समस्त संत महंत यांचा आशीर्वाद घेतला.यावेळी देगलूर काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकरराव कन्तेवार,दिनेश शेठ मुनगिलवार,जगन्नाथ सावकार चक्रवार,नंदू पाटील,रुपेश पाटील आदी जण उपस्थित होते..
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या