भास्कर दादा भिलवंडे यांचा वाढदिवस पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात साजरा !

ऑक्टोंबर सामाजिक बांधिलकी जपणारे, युवा नेतृत्व भास्कर पाटील भिलवंडे यांचा वाढदिवस सामाजिक कार्यकर्ते – शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या संपर्क कार्यालयात अत्यंत उत्साहाने साजरा झाला, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, सामाजिक क्षेत्रातील, ईतर मान्यवर मित्र परिवार आदींनी उपस्थिती लावून त्यांच्यावरील स्नेह कायम असल्याचे दाखवून दिले.
अभिष्टचिंतन प्रसंगी युवा नेते गजानन पाटील चव्हाण, कैलास दादा भालेराव, संजय पाटील चव्हाण, डेबूजी युथ ब्रिगेड चे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवाजी भाऊ ईबितदार, विश्वकर्मा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पोद्दार तळणीकर, माधव दादा कोरे, फुलारी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते गजानन फुलारी, सचिन फुलारी, संग्राम बेलकर, अमोल पांचाळ, प्रदीप जोंधळे, पिराजी वाघमारे, सुभाष पांचाळ, बंडू पांचाळ, विश्वनाथ पाटील खराडे, आदी विश्वकर्मा समाजातले कार्यकर्ते यांच्यासह उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत आणि दलित, पददलित, उपेक्षित आणि वंचित घटकावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात बुलंद आवाज उठवणारे, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे पाठीमागे उभे टाकून विविध समाजांच्या कल्याणासाठी राजकीय व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करणारे, माझे जिवलग माझ्यावर नेहमी बंधुत्वाची छाया देणारे, आदरणीय बंधु युवा नेतृत्व भास्कर दादा भिलवंडे असं व्यक्तिमत्व आहे, असे मत यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रसंगी शिवानंद पांचाळ यांनी व्यक्त करून त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य यश लाभो अश्या‌ पांचाळ परिवार, व मित्रमंडळाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या