भास्कर पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आ वसंतराव पा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, माजी जी प सदस्य माधव आप्पा बेळगे , प स सदस्य संजय पा शेळगावकर , माजी गटविकासअधिकारी अशोक पवळे, गटशिक्षणाधिकारी एम जे कदम , तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहवाल काळात मयत कर्मचारी व देश सेवेसाठी शहीद झालेल्या दिवंगत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार पतसंस्थेच्या वतीने करण्यात आला तदनंतर जिल्हा गुरु गौरव, तालुका गुरु गौरव, शिक्षक यांचा व गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचारी व संघटना तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव दत्ता पा भोसले यांनी केले पतसंस्थेचे चेअरमन नागेश चिंतावार यांनी अहवाल काळात केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडला तसेच पतसंस्थेची इमारत व्हावी यासाठी प्लॉट खरेदी केला असून बांधकाम करण्यासाठी सभागृहाने मंजुरी देण्याचे आवाहन केले मनोगतात शिवराज पाटील व संजय पाटील यांनी पतसंस्थेची वाटचाल ही काटकसरीची असून केलेल्या कामाचे तोंड भरून स्तुती केली. सर्व संचालकांना चांगल्या कामाबद्दल शुभेच्छा दिल्या. शेवटी अध्यक्ष समारोपीय भाषणात वसंतराव पाटील चव्हाण यांनी संस्थेची इमारत व्हावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आवश्यक ती मदत देण्याचे जाहीर केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष जाधव डी टी यांनी केले.
सभा यशस्वी करण्यासाठी अशोक पाटील बावणे माजी चेअरमन शंकर हसगुळे उपाध्यक्ष. बंडू पाटील भोसले,सचिव सदाशिव माने, नागभूषण वाघमारे खजिनदार. गणेश कल्याणी, गणेश कुर्हाडे, तोडे जी आर. राजू पाटील, मावले सर, कोटूरवार सर, भोजराज सर, सौ होनशेटटे सौ कोचारे या संचालकांनी व मोरे नरवाडे कानगुले या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली या आमसभेला मुसळधार पाऊस असतानाही बहुसंख्य सभासदांची उपस्थिती होती. हे उल्लेखनीय आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy