काँग्रेस नेते’ भास्करराव पाटील खतगावकर’ यांच्या कानमंत्रानंतर कुंडलवाडी बाजार समिती संचालकांची नाराजी दूर !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
         कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ७ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या नवनिर्वाचित पोलीस पाटलाच्या सत्कार कार्यक्रमास बाजार समितीचे ९ संचालक अनुपस्थित असल्याने नाराज असल्याची बातमी दिनांक 8 रोजी दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित झाल्यानंतर काँग्रेसचे नेते माजी खा भास्करराव पाटील खतगावकर यांनी सदरील बातमी गांभीर्याने घेत सभापती व उपसभापती सह नाराज सदस्यांना कानमंत्र दिल्यानंतर सभापती व उपसभापतीसह नाराज संचालक हे सभापती यांच्या हातावर हात देत सभापती सोबत आहोत असा संदेश देत संचालकांची नाराजी दूर झाल्याचे चित्र दि.१० फेब्रुवारी रोजी आयोजित मासिक सभेमध्ये दिसून आली.
संचालकांची नाराजी दूर झाली तरी मतदारांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे बाजार समितीचा विकास करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या