नांदेड जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना मागील काळात वेळप्रसंगी पक्ष बदलावे लागले होते आणि मी देखील मागील अनेक वर्षे काँग्रेसमध्ये आमदार – खासदार णून काम केलो त्यानंतर भाजपात काही दिवस गेलो परत काँग्रेसमध्ये आलो आणि आता मी आपल्या भागाचं हित जोपासण्यासाठी माझ्या अनेक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटांमध्ये २३ मार्चला प्रवेश करणार आहे अशी माहिती ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी नरसी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली .
या पत्रकार परिषदेला माजी खासदार तथा कंधार लोहा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर , जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी , माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा , अविनाश घाटे , प्रवीण चिखलीकर , भास्कर भिलवंडे , वसंत सुगावे , अशोक पाटील मुगावकर, बिलोलीचे तालुका अध्यक्ष रंजीत पाटील हिवराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती .
पुढे बोलताना भास्करराव खतगावकर म्हणाले की आपल्या भागातील अनेक विकासात्मक कामे हे अद्यापही प्रलंबित आहेत त्यामुळे शासकीय सत्तेत असणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विकासात्मक नेतृत्व आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून मी येणाऱ्या २३ मार्च रोजी नरसी येथे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात ३०० पेक्षा अधिक आजी माजी सरपंचासह इतर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसह मी आणि डॉ. मिनलताई खतगावकर पक्षप्रवेश करणार आहोत अशी माहिती दिली . त्याचबरोबर उद्या दिनांक २३ मार्च रोजी नरसी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पक्षप्रवेश मेळाव्यासाठी आपल्या भागातील किमान १५ ते २० हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy