आदर्श गाव करायचं असल्यास अभ्यासू उच्च शिक्षित उमेदवाराच्या हाती सत्ता द्या – भास्करराव पेरे…!

( उमरी- आनंद सुर्यवंशी )

ग्रामीण भागाचा आपल्या गावाचा खऱ्या अर्थाने विकास करावयाचा असेल,गावात शासनाच्या जास्तीत जास्त योजनांचा फायदा मिळवून घ्यायचा असेल,शासनाच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचंवायच्या असतील तर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत उच्चशिक्षित अभ्यासू निर्व्यसनी नेतृत्वाची निवड करा. माझ्या पाटोदा या गावात थंड, गरम, पिण्यासाठी शुद्ध पाणी, वापरण्यासाठी वेगळं अस पाच प्रकारचं पाणी मी जनतेला देतो.गावात धान्य,दाळी,मिरची दळण फुकट दिल्या जाते. शेतीसाठी अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर द्वारे शेतीची नांगरणी केल्या जाते. गावात शौचालय , घरकुल योजना 100 टक्के पूर्ण झाली आहेत. गावात शोष खड्डे सांडपाणी वर प्रक्रीया करून हे पाणी शेतीसाठी पुरविल्या जाते. ग्रामपंचायतची अगदी सुंदर सुसज्ज 2 मजली इमारत उपलब्ध आहे. ग्रामपंचायती चा सर्व कारभार संगणकीकृत करून पारदर्शक करण्यात आला आहे. पाटोदा ह्या माझ्या गावाला निर्मलग्राम, स्मार्ट विलेज,आदर्श गाव, गाडगे बाबा महाराज पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार आशा सर्वच पुरस्कारांनी माझं गाव गौरविलेलं आहे.

 

 

हे सर्व घडवायचं असेल तर अभ्यासू आणि उच्च शिक्षित नेतृत्वाचीच गावाला आवश्यकता असते. तेव्हा येणाऱ्या काळात असेच लोकप्रतिनिधी निवडावेत असे आवाहन आदर्श गाव निर्मल ग्राम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे पाटील यांनी गोदावरी शिक्षण संस्थेच्या वतीने गिरीष गोरठेकर इंग्लीश स्कुल उमरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

 

 

हा मार्गदर्शन कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. गाव विकासावर झालेल्या तब्बल एक तासाच्या भाषणास खेड्यापाड्यातून आलेल्या 5000 लोकांच्या जनसमुदायाने हजेरी लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी शिक्षण संस्थेच्या वतीने शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन भास्करराव पेरे पाटलांना गौरविण्यात आले.

 

 

या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विक्रम देशमुख यांनी केले. यावेळी आदर्श गावचे सरपंच सुनिल देशमुख ,उमरी तालुक्याचे माजी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर,सुभाष राव देशमुख, गोविंदराव पा. सिंधिकर आनंदराव येलमगोंडे युवा नेते कैलास देशमुख गोरठेकर,सतीश देशमुख,श्रीकांत देशमुख, विश्वजीत देशमुख, बी.बी.खतगाये गुरुजी, डॉ.माधव विभूते, रामराव कप्पावार, रमेश गंगासागरे,शिवाजी पा., आनंदराव पवार,शेख नवाज,रमीज बेग,केदार अमृतवाड, गंगाधर शिगळे,मुजमिल बेग,ताजोद्दीन मिस्त्री,रमेश हैबत्ते, खयास बेग,मारोती आरटवार, मु.अ.एस.एन.सुरकूटवार, एस.आर.हिवराळे, मुख्याध्यापिका सौ.स्वाती वच्चेवार, सौ.ज्योती देशमुख,सौ.शुभांगी पाळेकर इ. सह ग्रामीण भागातून आलेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी एस.डी. पवार,के.ए.तिजारे,बी.सी.डोंगरे, माधव जगदंबे, गणेश कवळे, ज्ञानेश्वर शेळके, मारोती शिगळे, मोगल फेरोज बेग,आवेज बेग, डी.बी.कदम, गोविंद निवळे,गोविंद वैजाळे, रमेश गायकवाड, दिगंबर इंगळे आदी जणांनी श्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजीराव पठाडे यांनी केले तर आभार महेश टिप्रेसवार यांनी मानले.

ताज्या बातम्या