भीम आर्मी च्या बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी नितीन गायकवाड यांची निवड !

[ नांदेड – इंद्रजीत डुमणे ]
     शासकीय विश्रामगृह नरसी येथे 16 डिसेंबर रोजी  दुपारी दोन वा. भीम आर्मी संघटनची कार्यकारणी करण्यात आली.यावेळी नितीन गायकवाड यांची बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी बिन विरोध निवड करण्यात आली.अन्याय अत्याचाराच्या विरोधात भिम आर्मी संघटना आवाज उडवणारी आक्रमक संघटाना आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशा नुसार बिलोली तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी भिम आर्मी चे बिलोली तालुका अध्यक्ष विकास  सोंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नितीन मधुकर गायकवाड यांची  तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
      यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंच चे आध्यक्ष भास्कर भेदेकर व साईनाथ कांबळे तसेच इंद्रजीत डुमणे,  विश्वंभर कांबळे मुळगावकर, यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या