भिमजयंती मंडळाच्या औराळा अध्यक्षपदी किरण वाघमारे तर,सचिवपदी आकाश सोनकांबळे !

नांदेड –  विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळ,औराळा अध्यक्षपदी किरण वाघमारे तर, सचिवपदी आकाश सोनकांबळे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली आहे.
       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या २१ एप्रिल रोजी दरवर्षीप्रमाणेच यंदाही मौजे औराळा ता.नायगांव (खै.) येथे धार्मिक व विविध सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्यानुषंगानेच येथिल बौद्ध विहारात भिमजयंती मंडळ कार्यकारिणी पूनर्गठित करण्यासाठी आज दिनांक ८ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यात अध्यक्षपदी किरण शंकरराव वाघमारे,सचिवपदी आकाश सोनकांबळे यांची सर्वानूमते निवड करण्यात आली.उर्वरित कार्यकारिणीत सदस्यपदी अमोल वाघमारे, प्रशांत सुनील वाघमारे,महेन्द्र वाघमारे,प्रवेश वाघमारे,प्रदिप सोनकांबळे,गौतम वाघमारे यांची सर्वानुमते निवड झाली.
  यावेळी पोलीस पाटील सौ.ज्योतीबाई किशन वाघमारे, भगवान वाघमारे,चंद्रकांत वाघमारे,सरपंच प्रतिनिधी गौतम मोहन वाघमारे, ज्योतिबा वाघमारे, अमोल वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव बाळासाहेब सोनकांबळे,वंचित बहुजन आघाडी ता.उपाध्यक्ष सतिश वाघमारे,मारोती वाघमारे,प्रसेनजित वाघमारे, शंकर फुगले, विजय वाघमारे,भुजंग गायकवाड आदींची उपस्थिती होती 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या