कुंडलवाडी येथील भीम जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कुंडलवाडी येथील डॉ आंबेडकर नगर येथे एक बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भीम जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून गौतम चांदू वाघमारे, उपाध्यक्ष गौतम वामन वाघमारे, मारोती शंकर येलमे, सचिव साईनाथ गंगाधर वाघमारे, सहसचिव संतोष वाघमारे, कोषाध्यक्ष आकाश हातोडे, आशिष वाघमारे, संघटक सुशील हातोडे, अभिनंदन वाघमारे, प्रथमेश कांबळे, संदेश वाघमारे आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी सर्व समाज बांधवांकडून नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या