भिम टायगर सेनेच्या ऑटो युनियन अध्यक्ष पदी क्रांती कांबळे यांची निवड !

नरसी– शासकीय विश्रामग्रह नरसी येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता. भिम टायगर सेना ची ऑटो युनियन कार्यकारिणी करण्यात आली. क्रांती कांबळे यांची ऑटो युनियन बिलोली तालुका आध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
       यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फुले-शाहू-आंबेडकर क्रांती मंच चे अध्यक्ष भास्कर भेदेकर तसेच लोकमत चे पत्रकार यशवंत मोरे, पत्रकार खाजा भाई शेख, पत्रकार बळीराम गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी भीम टायगर सेनेचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवड करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष म्हणून बाबुराव सोनकांबळे तर सचिव सुरेश बनसोडे आदींची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचचे प्रमुख भास्कर भेदेकर यांनी अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या