पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्धांच्या ताब्यात मिळण्यासाठी भिम टायगर सेना लवकरच हाय कोर्टात याचिका दाखल करणार – दादासाहेब शेळके 

[ मास महाराष्ट्र न्युज नेटवर्क ]
1 ऑगस्ट 2020 रोजी एक ऐतिहासिक घटना घडली असून तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यातील थलाई वेट्टी मुनीयप्पन मंदिर हे बौद्ध विहार असल्याचे मद्रास उच्च न्यायालयाने जाहीर केले आहे.
त्याबद्दल मद्रास हायकोर्टाचे जाहीर अभिनंदन मुळातच आपल्या भारत देशात अनेक धर्म आहेत.उदा हिंदू, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन इ.असुन प्रत्येक धर्माचे मंदिरे, पुतळे, प्रार्थना, स्मृती स्थळे उभे आहेत. तसेच प्रत्येक धर्माचे मिळावे,परिषदा,रॅली धर्माचा प्रसार करणे इ. कार्यक्रम बिन्धास्त व गुण्यागोविंदाने भारतात होत असतात त्याला कारणीभूत असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान आहे.कारण संविधानातील fundamental rights मधील right to freedom of religion मधील article 25,26,27,28 होय.तसेच जर कोणी कोणत्याही धर्माचा अपमान, धार्मिक श्रद्धांचा अपमान,धार्मिक जमावस अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे व जर कोणी धार्मिक भावना दुखावत असेल तर त्याच्यावर भादवी. 295,295अ, 296, 297,298 अन्वये गुन्हा दाखल होत असून आरोपीस तीन वर्षापर्यंत त्यात शिक्षा आहे.पूर्वी अनेक जणांनी सत्ता, संपत्ती, साधने, मनुष्यबळ यांच्या जोरावर बौद्ध धर्मांच्या मंदिरावर (विहार) अतिक्रमण केलेले आहे.
त्याचेच उदाहरण म्हणजे 1ऑगस्ट 2022 रोजी तामिळनाडू राज्यातील सेलम जिल्ह्यातील पेरीयारी गावातील रोडवर दानात विव्यास नामक संस्थेच्या अधिपत्याखाली थलाई वैट्टी मनीअप्पन हिंदू मंदिर असून त्यात जी देवी आहे ती देवी नसून बुद्ध मूर्ती आहे तसेच ते हिंदू मंदिर नसून बुद्ध विहार असल्याचा निर्णय व मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन.आनंद व्यंकटेश च्या एक सदस्यीय पिठाने ऐतिहासिक पुरावे, संविधानिक चौकशी पुरातत्त्व विभागाच्या अहवालाच्या आधारे 1 August 2022 रोजी दिला असून तात्काळ हि बौद्ध मूर्ती असल्याचे सूचनाफलक बाहेर लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 2017 मध्ये थलाई वेरी मनीअप्पा व बौध्द ट्रस्ट च्या वतीने बौद्ध मूर्ती संदर्भात वरील याचिका दाखल केली होती.मुळातच सम्राट अशोक राजा यांच्या काळात देशात 84 हजार बौद्ध विहार बांधले असून त्या बुद्ध विहारावर धर्मांध व राक्षसी वृत्तीच्या लोकांनी कब्जा केलेला आहे. उदा.1) पंढरपूरचे विठ्ठल मंदिर 2) उडीसाचे जगनाथ पुरी 3)तामिळनाडू मधील कोचीपुरम 4) आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर 5) मध्य प्रदेश मधील काली मंदिर उज्जैन 6) लोणावळ्यातील एकवीरा देवीचे मंदिर व ई. मंदिर व मंदिरातील देव देवता हे बुद्ध विहार व बुद्धमूर्ती असल्याचे अनेक इतिहास तज्ञाने सिद्ध केलेले आहे. उदाहरणार्थ 
2 ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या who is pandurang या 1955 च्या शोध निबंधात लिहितात पंढरपूरचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कुणी नसून तो तथागत गौतम बुद्धच आहे.
 3 ) डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाषणे खंड भाग 18 part टू page नंबर 424 मध्ये विठ्ठला वरची सर्व दागिने काढा ती वस्तुत बुद्धाचीच मूर्ती आहे हे लक्षात येईल.
4 ) संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम इ.संतानी त्यांच्या अभंगात विठ्ठला हा बुद्धच असलेल्याचे म्हटले आहे.
5 ) प्रबोधनकार ठाकरे त्यांचा “देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे” १९२९ या पुस्तकात लिहितात अनेक ठिकाणी बौद्ध मूर्तीचा उच्छेद केला आणि तेथे शिवलिंग स्थापन केले आहे. असे शेकडो ने पुरावे देता येईल पण सत्तेपुढे कुणाचे चालते या देशात धर्मांध आणि जातीवादी लोकांची सत्ता असून त्याच्याकडे साधन, संपत्ती व मनुष्यबळ असल्यामुळेच ते सर्व असंविधानिक कामे करत आहे. पण मद्रास हायकोर्टाच्या निर्णयामुळे आजही या देशात संविधानाचे राज्य असल्याचे सिद्ध झालेले आहे.त्यामुळे भविष्यात दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी आणि ज्यांनी बौद्धांचे बुद्ध विहारे बळकावले त्यांच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी मी स्वता भीम टायगर सेना ह्या क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमा तून लवकरच संविधानिक लढा उभा करणार असून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर व आंध्र प्रदेश मधील बालाजी मंदिर व देशांतील इतर बोध्द विहार बळकावले त्या संदर्भात ति बौद्ध विहारे बौद्धाच्या ताब्यात घेण्यासाठी ज्येष्ठ आंबेडकरी साहित्य डॉक्टर प्रदीप आगलावे सर,नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद हायकोर्टाचे वकील एडवोकेट मधुकर परघणे साहेब एडवोकेट नामदेव सावंत साहेब यांच्या माध्यमातून औरंगाबाद उच्च न्यायालयात लवकरच याचिका दाखल करणार आहोत.यासाठी आपणा सर्वांची साथ अपेक्षित आहे. सत्यमेव जयते
जय भीम जय संविधान…
दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना, 8767744644

ताज्या बातम्या