भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनाचे नियोजन !

( पुणे )-

भीमा कोरेगाव विजय स्तंभ सूर्य दिन 1 जानेवारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक तसेच आंबेडकरी पक्ष संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. बैठकीत खालील प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

31 डिसेंबर मध्यरात्री 12 वा.
भिख्खू संघाच्या उपस्थित धम्म वंदना.

1 जानेवारी रोजी
🔹 धम्मदेसना बुध्द वंदना.

🔹 समता सैनिक दलाचे संचलन व बॅण्ड पथकासह मानवंदना.

🔹 मान्यवरांकडून विजयस्तंभाला अभिवादन व मानवंदना .

कोणत्याही संघटना-पक्षाच्या सभा व कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. व कोणत्याही संस्था संघटना यांचे फलक / बॅनर त्या ठिकाणी लावण्यात येणार नाहीत. केवळ प्रातिनिधिक स्वरूपात मध्ये हा कार्यक्रम covid-19 च्या पार्श्वभूमीवर करण्यात येईल असे सर्वानुमते पुन्हा एकदा ठरले.

या बैठकीला जिल्हाधिकारी विक्रम देशमुख पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ पोलीस उपायुक्त दिनेश गिट्टे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे, पोलीस उपअधीक्षक सई भोरे मॅडम, पोलीस उपाधिक्षक राहुल मुंडे आदींसह समन्वय समितीचे राहुल डंबाळे, ज्येष्ठ नेते ॲड. भाई विवेक चव्हाण, मा. परशुराम वाडेकर , माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन सेनेचे युवराज बनसोडे, विवेक बनसोडे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश भालेराव, शिवसेना पंचायत समिती सदस्य व सेवा समिती अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, समता सैनिक दलाचे पी. एस. ढोबळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वांच्या वतीने नागरिकांनी घरच्याघरी अभिवादन करून हा कार्यक्रम साजरा करावा असे आवाहन केले आहे.

– राहुल डंबाळे

      अध्यक्ष
भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समिती
9822917119

ताज्या बातम्या