भोई समाज संघर्ष सेना संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्षपदी राम रघुपती !

[प्रतिनिधि – इंद्रजीत डुमणे ] 
शासकीय विश्रामगृह बिलोली येथे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता घेण्यात झालेल्या बैठकीत भोई समाज संघर्ष सेना संघटनेची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.

  बिलोली तालुक्यातील अटकळी येथील सामाजिक कार्यकर्ता युवा नेतृत्व राम रघुपती यांची सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली भोई समाज संघर्ष सेना संघटन मजबूत व्हावी यासाठी उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत बिलोली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी भोई समाज संघर्ष सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनजी एस भोई, प्रदेश अध्यक्ष विजय जि खेडकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रविन जी भोई यांनी त्यांची बिलोली तालुक्यात सर्वाधिक भोई समाज संघर्ष सेना संघटना मजबूत व्हावी यासाठी संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष राम रघुपती यांची निवड केेेली.
सर्व भोई समाज संघर्ष सेना टिम यांच्या उपस्थितीत राम रघुपती यांना निवडीचे पत्र देण्यात आले. भोई समाज संघर्ष सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन जि भोई यांच्या आदेशानुसार बिलोली तालुकाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या