दिवशी अत्याचार प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावे – सोमठाणा गावकऱ्यांची मागणी
( प्रतिनिधी नांदेड जिल्हा-आनंद सुर्यवंशी )
उमरी – भोकर तालुक्यातील दिवशी येथे एका क्रूरकर्मा व्यक्तीने एका पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा अमानुष खून केला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेवरून लक्षात येते की, देशात आज मुली सुरक्षित नाहीत.राष्ट्रीय बालिका दिनाच्या दोन दिवस अगोदर ही घटना घडली.
मौजे सोमठाणा गावकऱ्यांच्या वतीने गुन्हेगारास लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे उमरी तहसीलदारांना करण्यात आली.
सदर निवेदन शंकरराव बेळकोणे,बालाजीराव पंतोजी,पांडुरंग कोल्हेवाड,राहुल सोनकांबळे,प्रशांत मारोतराव नागुलवाड,संतोष साहेबराव नागुलवाड, नागनाथ गुणाजी नागुलवाड,बाबुराव गंगाधर यडलेवाड,साईनाथ केशवराव पुदलवाड, शंकर दत्ताराम पुदलवाड, ज्ञानेशर साहेबराव ताडेवाड, साहेबराव नागुलवाड, सतोष नागुलवाड यांच्या हस्ते देण्यात आले.