भोकर तालुक्यात टेम्पो-जीप चा भीषण अपघात; नवरी सह पाच जण जागीच ठार !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]     
   ● नांदेड जिल्ह्यातील सोमठाणा (ता.भोकर) येथे मांडव परतणीसाठी नवरीला माहेरला घेऊन जात असताना मॅक्झीमो जीप (क्र. एम.एच.२९ ए आर ३२१९) आणि टेम्पो (क्र-एम.एच.०४ ए एल ९९५५) समोरासमोर भीषण अपघात झाला. यात टाटा मॅजिक गाडीमधील नवरी व तिच्या भावासह पाच जण ठार झाले आहेत.
या अपघातात अवघ्या तीन दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेली नवरी आणि तिच्या भावाचा जागीच मृत्यू झाला. नवरदेव मृत्यूशी संघर्ष करत आहे. ही घटना आज सोमवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भोकर-हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. अपघाताची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिको जीप (क्र MH-29/AR-3219) हा नवरीची मांडव परतणी साठी जारीकोट ता.धर्माबाद येथुन साखरा ता.उमरखेड जि.यवतमाळ येथे जात असताना सोमठाणा (ता.भोकर) शिवारात चटलावार यांच्या धाब्यासमोर हिमायतनगर कडुन नांदेडकडे टेम्पो (क्र-एम.एच.०४ ए एल ९९५५) या विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात नवरी पुजा ज्ञानेश्वर पामलवार (वय 21) रा.साखरा ता.उमरखेड, दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (वय 22) (नवरीचा भाऊ) माधव पुरबाजी सोपेवाड (वय 30) रा.जांबगाव ता.उमरी, सुनिल दिंगाबर धोटे (वय 28) रा.चालगणी ता. उमरखेड (मैजिक चालक ), एक अज्ञात इसम असे मयत झाले असून नागेश साहेबराव कन्नेवार वय 28 रा.जारीकोट, अविनाश संतोष वंकलवाड रा.तामसा, अभिनंदन मधुकर कसबे (वय 16) रा.वाजेगाव, सुनिता अविनाश तोपलवार वय 35 रा.तामसा यांच्यासह अनेक जण गंभीर जखमी झाले असून जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडल्यासारखे चित्र अवघ्या तीन दिवसांपूर्वी विवाह झालेली नववधू माहेरी परतणीचा कार्यक्रम करून सासरी जात असताना हा अपघात झाला. मिनी व्हॅन आणि ट्रकची धडक झाल्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली. ही धडक एवढी जबरदस्त होती की घटनास्थळी रक्‍ताचा सडा पडल्यासारखे चित्र होते. मरण पावलेल्यांचे हात पाय तुटून पडले होते.
या अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली गेल्याने जेसीबी मशीनच्या सहाय्याने वाहनांना बाहेर काढण्यात आले. अपघातातातील जखमी व मृतांची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. माहेर परतणी आटोपून परतत असताना वाटेतच ही दुर्घटना घडली. मेहंदी सुकन्यापूर्वीच नवरी आणि तिच्या भावाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या