शेती आणि माती बद्दल तळमळ असणारा शेतकरी भूमिपुत्र नेता- बालाजी पाटील नागनीकर !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
नेहमी आपल्या भागामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचं प्रमाण राहते…कधीतरी आपली जमीन पूर परिस्थितीमुळे अतिवृष्टीमुळे जाते तर,कधी कोरडा दुष्काळ यामुळे जाते… याच परिस्थितीमुळे बाभळी बंधारा बॅक वॉटरचे पाणी व निजामसागर या तलावाचं बॅक वाटर निजामसागर चे सोडलेले पाणी व तेलंगणातील पोचमपाड चा डॅम याचं बॅक वॉटर नेहमीच कोणत्यातरी कोणत्या कारणाने ओला नाही तर,कोरडा दुष्काळचं राहते…
याकरिता वेळोवेळी ट्रॅक्टर मोर्चा आंदोलन घेतला गेला, शेतकऱ्याचा पिक विमा पिक विम्याच्या काही जाचकअटी रद्द करावे म्हणून,तहसील कार्यालयासमोर मोठा भव्य असा ट्रॅक्टर मोर्चा काढला… त्या मोर्चामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या पिक विमाच्या जाचक अटी बदला व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला द्या…व निजामसागर पोचमपाडच्या बॅक वॉटरचे विषय सोडवा…व आपलं जे पाणी वाहून जाते ते शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी आणा व शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली आणा…दरवर्षी सोयाबीनचे बोगस बियाण्याचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे.
या क्षेत्रातील मुख्य पीक हे सोयाबीनचं आहे…व त्या बोगस बियाणामुळे आपण पहिलेच शेतकऱ्यांना महाग बियाणे तीन तीन हजार रुपयाला बॅग मिळतात… एकदाच पेरणी करायला अवघड होते तर,बोगस बियाणामुळे त्याची पेरणी करून सुद्धा त्याचं बियाणं उगवत नाही… व उगवलं तर फक्त 30 ते 40% उगवते… जवळपास 70 टक्के बियाणं बोगस असते या संदर्भात देखील अधिकाऱ्यांना वेळोवेळी जॉब विचारण्यात आलं… एकदा कलेक्टर साहेबांना आणून देखील या बोगस बियाणांचं पंचनामे देखील करण्यात आले…बिलोली तालुक्यातील बाबळी कार्ला या ठिकाणी तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब हे देखील उपस्थित होते…त्यावेळीचे कलेक्टर साहेब,डॉक्टर विपिन इटणकर हे होते…व तहसीलदार राजपूत साहेब होते.
ही सर्व पंचनामे करताना त्याच वेळेस बालाजी पाटील शिंदे यांना कोरोनाने ग्रासलं होतं संक्रमण झालं होतं… हा कोरोना फर्स्ट टर्मचा होता…जनतेच्या सहवासात आल्यामुळे हा कोरोना झाला होता…त्याच कोरोनाच्या काळामध्ये बेरोजगार लोक जी गोरगरीब मजूर लोक होती…त्या लोकांना जवळपास 25 क्विंटल असं धान्य तांदुळाचं वाटप करण्यात आलं होतं…निसर्गाचे संतुलन बिघडू नये म्हणून दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण देखील करण्यात येते.
जवळपास आजपर्यंत बालाजी पाटील शिंदे यांनी अनेक गावामध्ये भरपूर असे 5000 वृक्षारोपण केले आहे…बालाजी पाटील शिंदे यांना नेहमी असं वाटतं की शेतकरी या कचाट्यातून बाहेर पडला पाहिजे… सध्याचे लोकप्रतिनिधी यामध्ये जातीने लक्ष घालत नाहीत…त्यांना या गोष्टींमध्ये रस नाही व प्रशासनातील अधिकारी देखील या व्यापारी लोकांसोबत हात मिळवणी करून ते त्यांच्या रंगांमध्ये आहेत…त्यांना काहीच कसल्या प्रकारचं देणं घेणं नाही… आपण एक शेतकरी पुत्र म्हणून त्याचा नेहमीच पाठपुरावा करत आहोत…शेतकऱ्यांना मदत करण्याचा हेतू एवढाच की,या परिस्थितीतून कोणीतरी त्यांचा आवाज उचलून या परिस्थितीवर मात केलं पाहिजे…या परिस्थितीवर मात जर केलं तर, जे काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत… त्याचं प्रमाण कुठेतरी कमी होईल थांबल्या जातील… त्यांना काहीतरी धीर देऊन एखाद्या घरात आत्महत्या झाली तर,एक्सीडेंट मध्ये शेतकरी वारला तर,विज पडून असेल झाडावरून काहीतरी काम करताना असेल,रात्रीच्या वेळेस शेताकडे जात असताना साप वगैरे चावून संध्याकाळच्या बारा वाजता लाईटच्या कारणास्तव साप चावून असेल,अशा विधवा महिलांना त्यांच्या घरातील एखादी एक एकर दोन एकर जमीन असलेल्या अशा लोकांना बियाणं वाटप करण्यात आलं.
जेणेकरून तर त्यांना आपण जास्तीत जास्त मदत स्वरूपामध्ये तेवढे काही मोठी रक्कम त्यांना लाख रुपये देता येत नाही…पण, आपला एक प्रामाणिक हेतू एवढा होता की, एका शेतकऱ्याच्या कुटुंबाला एक बियाणं बॅग दिली तर,सरासरी त्यातून त्याला सात ते दहा क्विंटल सोयाबीन पिकलं तर, त्या शेतकऱ्याला कमीत कमी पन्नास एक हजार रुपये मिळतील… व ती मदत त्याला पुढच्या वर्षी देखील अजून पेरणीसाठी होईल म्हणून त्यांना हा बेस तयार करून देण्याचा हा वाढदिवसाच्या निमित्ताने प्रयत्न करण्यात आला… माझा मानस आहे की, येणाऱ्या या वर्षांमध्ये त्यांना बियाणे दिल्यानंतर त्यांचे माझ्याकडे संपर्क आहेत…त्यांना नंतर मी येणारा पुढील खताचा खर्च असेल किंवा फवारणीचा खर्च असेल किंवा ट्रॅक्टरने पेरणी करून द्यायचं असेल ते सुद्धा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे… म्हणजे जसं की दत्तक घेतल्यासारखं असा माझा हेतू आहे…क्या बात है…खरंच बालाजी पाटलांचा उदात्त हेतू जे काही उदारीकरणाचं म्हण आहे… खूप मोठा आहे खरंच सरासरी तीन हजार रुपये जरी देखील धरलं तरी,तीन लाख रुपये जवळपास होतात…या बियाणांचे हा माणूस सहज शेतकऱ्यांबद्दल खर्च करत आहे…आमदार नाही ना,खासदार नाही ना,कोणता मंत्री पण आला नाही.
ना कोणी विचारलं नाही…शेतकऱ्यांना या भागामध्ये आपल्या हा माणूस शेतकऱ्यांबद्दल मातीची नाळ ठोकून आहे…असं कोणी करत नाही पण,शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला येऊन जे ग्राउंड लेव्हलवरचे संपर्कात असलेले लोक असतील…त्यांच्या अडचणी काय आहेत ते आपल्याला शंभर टक्के माहिती आहे…बेसिकली त्यांना सक्षम करण्याचा प्लॅन त्यांच्याकडे आहे…आपली थोडीशी छोटीशी मदत त्यांना स्टॅन्ड करण्यास मदत होईल…असं बालाजी पाटील शिंदे यांचे मत आहे…आपण एखाद्याला जर मदत केलं तर, हजार दोन हजार रुपयाच्या आत मध्ये मदत करतो…पण याने हा शेतकरी स्टॅन्ड होत नाही…म्हणून बियाण्याचं बॅग वाटप करण्याचं मी ठरवलं आहे… ज्याने यातून शेतकरी थोडाफार बाहेर पडेल त्यांच्या मतानुसार जवळपास 100 बॅग म्हणजे सरासरी जरी प्रति बॅग सात क्विंटल जरी धरलं तरी 700 क्विंटल होईल…म्हणजेच जवळपास 30-35 लाख रुपयांची मदत त्यांना होईल आणि असं पैसे देऊन जर मदत केलं तर त्यांना देखील योग्य वाटत नाही… व इतका उत्पन्न देखील त्यातून निघत नाही…बालाजी पाटील शिंदे यांच्याकडे फ्युचर प्लॅन देखील आहेत…यांच्या दृष्टीमध्ये ब्राईटनेस दिसत आहे.
खरंच बालाजी पाटील शिंदे यांची संकल्पना खूपच छान आहे… या भागातल्या शेतीचा देखील बालाजी पाटील शिंदे यांना जवळपास अभ्यास आहे…या आपल्या भागातील पूर्ण जमीन सिंचनाखाली ओलिताखाली आणू शकता येतं जसं की,पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचा भाग आहे… तसे देखील आपला भाग संपन्न होईल त्यांचं मत असं आहे… की, इथे एक तरी जिवलग नेता असला पाहिजे ज्यांनी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपला आवाज उचलला पाहिजे…याबद्दल त्यांच्या मनामध्ये तळमळ असली पाहिजे…खरोखरच त्यांच्या मनात जर इच्छा झाली तर,या भागातील जमिनीचा भाग सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही…पोचमपाड व निजामसागर च्या बॅग वाटरमुळे आपल्या भागातील हाताला आलेलं पिक ओलिताखाली येते व सर्व नासाडी करून जाते… जेव्हा आपल्याला हरभऱ्याला पाणी द्यायचं असते… त्यावेळेस आपल्याकडे थेंबभर पाणी नसते…त्यांचा प्लॅन असे आहे त्यांना जेव्हा पाणी लागते तेव्हा ते घेतात…व जेव्हा लागत नाही तेव्हा ते तसंच ठेवतात…याचा दुष्परिणाम आपल्या भागातील शेतकऱ्यांवर होत आहे… म्हणजे आपलं दोन्ही कडूनही मरण आहे…आपण जर या भागातील पाण्याला जर बरोबर उपयोग करून घेतला तर, म्हणजेच एकीकडे गोदावरी व एकीकडे मांजरा नदीचे पात्र आहे या दोन्ही नद्यांचा जर आपण पुरेपूर फायदा घेतला तर,आपली जमीन ओलिताखाली नक्कीच येते व आपला भाग सुजलाम सुफलाम होऊ शकते…कारण आपल्या भागातील मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे… म्हणजे ही जमीन जर ओलीताखाली आली तर,आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत… कुठल्याच अशा शेतकऱ्यावर संकट येणार नाही…त्यासाठी छोटी छोटी जरी बंधारे आपल्या नदीवर घेतले तर,त्या बंधार्‍यामधून आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते… नदीकाठोकाठ जरी पाणी असलं तर,बोरला पाणी येऊ शकते तळ्याला पाणी येऊ शकते… व पाण्याची पातळी देखील वाढते या सर्व गोष्टी खूप छान आहेत… आपल्या नदीकाठावरील जी गाव आहेत त्या गावातील एक प्रमुख व्यक्ती घेऊन जी पाणी समिती असते…या संदर्भामध्ये एक मोठं जनआंदोलन उभारून प्रत्येक गावामध्ये जाऊन या संदर्भात जनजागृती करून जन आंदोलन उभा करून शंभर टक्के आपल्या भागातील आपल्या काळामध्ये आपल्या हयातीमध्ये असेपर्यंत हे झालंच पाहिजे…म्हणजे याचा भविष्यात खूप मोठा फायदा होऊ शकते…असं बालाजी पाटील शिंदे यांचे मत आहे खरंच बालाजी पाटील शिंदे यांचे खूप छान शेतकऱ्यांच्या संदर्भात विचार आहेत त्यांच्या डोक्यामध्ये छोटी छोटी खूप प्लॅन्स आहेत…जी शेतकऱ्यांच्या हितासंबंधाचे आहेत त्यांच्या मते जन्माला आल्यानंतर आपल्या या समाजाप्रती काहीतरी देणं असते… म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे… खरंच त्यांना भेटून मला खूप आनंद वाटला कारण शेतकऱ्याप्रती त्यांचं असलेलं प्रेम त्यांचा उदात्त हेतू मला समजला…बालाजी पाटील शिंदे यांच्याशी वाढदिवसाच्या निमित्त झालेली एक भेट.

दत्ता राजेश्वर हामंद –                                 (एम.ए.राज्यशास्त्र, एम.ए. इंग्लिश कुंडलवाडी)

ता. बिलोली. जि. नांदेड // संपर्क 9673650687, 7666687418

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या