कोविड लसीकरणाला कुंडलवाडीत चांगला प्रतिसाद !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशान्वये महा लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे, डॉ नरेश बोधनकर यांनी दिली आहे.
देशात व राज्यात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात यंदा गणेश उत्सवाच्या निमित्ताने महा लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक गणेश मंडळात यंदा सार्वजनिक उपक्रम न राबविता आरोग्य विषयक कोविड महा लसीकरण मोहीमेला सुरू करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी नगरपालिकेच्या वतीने के रामलू कॉम्प्लेक्स मध्ये दोन दिवशी महा लसीकरण शिबिर कॅम्प आयोजित करुण त्यामध्ये चौदाशेच्या वर व्यक्तींना पहिली व दुसरी लस देण्यात आले, तर गणेश उत्सवाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी गणेश मंडळ पोचंमागल्ली येथे शिबिर आयोजित करून याठिकाणी 243 च्यावर नागरिकांना लस देण्यात आली.
यापुढे शहरातील प्रत्येक गणेश मंडळात लसीकरण शिबिर घेऊन ज्या गणेश मंडळाने सर्वाधिक लसीकरण करून घेईल आशा मंडळास प्रथम,द्वितीय, तृतीय,पारितोषिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे.
त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाने लसीकरणच्या कामाला लागले असून नागरिकांना लसीकरण करून घेण्यास भाग पाडत आहेत तर नागरिक ही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आशा अनोख्या उपक्रमामुळे शहर पूर्णतः लसीकरणयुक्त होईल हे मात्र नाकारता येणार नाही.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या