बिलोलीत रक्तदान शिबिरामध्ये ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान !

[ बिलोली – सुनिल जेठे ]

आॕल ईंडिया तन्जिम ऐ ईन्साफ शाखा बिलोली च्या वतीने २६/११ हल्यात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ व हजरत टिपू सुल्तान यांच्या जयंतीनिमित्त दि.२८ नोव्हेंबर रविवारी रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर २६/११ च्या मुंबई च्या दहशत वादी हल्यात शहिद झालेल्या जवानांना व अधिका-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदर रक्तदान शिबिराचे उदघाटन माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी हे होते. तर प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिक्षक डाॕ.नागेश लखमावार, उपनगराध्यक्ष मारुती पटाईत, माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, नगरसेवक अनुप अंकुशकर, जिल्हा अध्यक्ष अ.बशिर अ.मजिद, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष म.मोईन कुरेशी, नगरसेवक प्रकाश पोवाडे, नगरसेवक प्रतिनीधी नितिन देशमुख, मुन्ना पोवाडे, संतोष उत्तरवार आदिंची उपस्थिती होती.

कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांच संघटनेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जि.अध्यक्ष अ.बशिर अ.मजिद, उपनगराध्यक्ष मारुती पटाईत, नगरसेवक अनुप अंकुशकर, मौलाना मुबीन खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सुञसंचलन व आभार मोहसीन खान यांनी मानले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी आॕल ईंडिया तन्जिम ए ईन्साफ ता.अध्यक्ष ए.जी.कुरेशी, ता.सचिव सय्यद रियाज, नगरसेवक शाहेद बेग , रफीयोदिन ईनामदार, मौलाना मुबीन खान, प्रा.मोहसीन खान, कुंडलवाडी शाखेचे अध्यक्ष माजीद नांदेडकर, रफियोदिन ईनामदार, शेख.ईरशाद , सय्यद फिरदोस, शेख.अजमत, मुज्जु बाबु बेग ईनामदार, गफार कुरेशी, असलम कुरेशी, अलीम कुरेशी, शेख चाँद, समिर पटेल आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड रक्तपेढी चे डाॕ.नितेश ईंगोले, डाॕ.घोडके, शरद अवचार, अतुल ताकसांडे, शेख.हमीद, राजू औराडे रक्तदान कामी सहकार्य केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या