बिलोली न.प.चा घन कचरा व्यवस्थापन डपिंग ठिकाणी हवा गुणवत्ता निरिक्षण केंद्र द्वारे दूषित हवेची तपासणी !

 ● बिलोली नगर परिषदेचा घन कचरा व्यवस्थापन कागदावरच होते. आता हवा गुणवत्ता निरिक्षण केंद्राच्या तपासणी अंती घनकचरा व्यवस्थापनाच्या गुत्तेदारासह नगर परिषदेचे काय होईल याकडे शहरवासियांचे लक्ष?

(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे)

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन तर्फे वातावरणीय हवा गुणवत्ता निरिक्षण केंद्र द्वारे बिलोली शहरातील घन कचरा व्यवस्थापन डपिंग ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक प्रमाणे किती आहे याची चाचपणी दिनांक १९ जानेवारी रोजी करण्यात आली.

सदरिल बिलोली नगर परिषदेने शहरातील घन कचरा व्यवस्थापन माध्यमातून ओला व सुका कचरा कुंडलवाडी रस्त्या जवळ डपिंग ठिकाणी प्रदूषण मुक्त पर्यावरण आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन तर्फे  वातावरणीय हवा गुणवत्ता निरिक्षण केंद्र द्वारे तपासणी केली गेली.
 हवा गुणवत्ता मध्ये ० ते ५० चांगली हवा, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम चांगले, २०१ ते ३०० खराब , ३०१ ते ४०० अतिशय खराब, ४०१ ते ५०० गंभीर.
यात हवा कोणती आहे, ही माहिती मिळताच त्यात प्रदूषण मुक्त हवा असावे जर -तर दूषित हवा, अतिशय खराब हवा आढळून आल्यास घन कचरा व्यवस्थापनाचे गुत्तेदारासह नगर परिषदेवर कार्यवाही होऊ शकते अशी माहिती महाराष्ट्र शासन छ. संभाजीनगर फिरते फथक वातावरणीय हवा गुणवत्ता निरिक्षण केंद्राचे इंजिनियर महेश काळे यांनी दिले.
तर बिलोली नगर परिषदेचे घन कचरा व्यवस्थापन कागदावर होते की यापासुन दूषित वातावरण होते की नाही हे आता हवा गुणवत्ता निरिक्षण केंद्राच्या माध्यमातून तपासणी केल्यावर घन कचरा व्यवस्थापनाच्या गुत्तेदारासह नगर परिषदेचे काय होईल ? अशी चर्चा जनतेतून बिलोली शहरात होत होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या