बिलोली येथे हिंदी मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शंकर पवारे तर उपाध्यक्षपदी वैभव घाटे यांची निवड !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली येथे हिंदी मराठी पत्रकार संघाची नुकतेच कार्यकारणी जाहीर झालेली असल्यामुळे कार्यकारिणीच्या माध्यमातून बिलोली तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी दैनिक निजामाबाद समाचारचे ज्येष्ठ पत्रकार शंकर पवारे तर बेधडक महाराष्ट्रचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी वैभव घाटे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे मान्यवरांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडी बद्दल बिलोली तालुक्यातील तमाम जनतेतून हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत असून यावेळी प्रकाश फुगारे सचिव विजयकुमार सोनकांबळे सहसचिव गणपत धर्मापुरे व सदस्य लालबा गोणेकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले आहे.
बिलोली येथे स्वतंत्र हिंदी मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी असावी म्हणून सदरील पत्रकार संघाचे नूतन विद्यमान अध्यक्ष शंकर पवारे उपाध्यक्ष वैभव घाटे यांनी मोठ्या जिव्हाळ्याने सदरील कार्यकारणीची निर्मिती केली असल्यामुळे हिंदी मराठी पत्रकार संघाची नुकतीच कार्यकारणी जाहीर झाली आसुन या संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून शंकर पवारे यांची विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत बिलोली येथे शासकीय विश्राम ग्रह येथे निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांच्या निवडीचे नायगाव तालुक्यासह बिलोली तालुक्यातून सर्व पत्रकारांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून सदरच्या कार्यकारणीचे संघटक म्हणून मृत्युजा शेख कोषअध्यक्ष नंदकुमार जाधव प्रसिध्दी प्रमुख गौतम गांवडे यांची यावेळी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील आपआपल्या हक्काचा पत्रकार संघ असला पाहिजे या डोळस विचारातून सदरच्या कार्यकारिणीची निर्मिती करण्यात आल्याचे नूतन पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर पवारे व उपाध्यक्ष वैभव घाटे यांनी सांगितले असून या हिंदी मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली यांच्या निवडी बद्दल राजकीय क्षेत्रासह विविध सामाजिक संघटना पत्रकार व्यापारी गट व इतर जन सामान्य माणसासह जनतेतून सदर निवडीचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत असून सदरची निवडी बदल वेगवेगळ्या क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत असून राजाराम अरगुलवार सोपान गारे इत्यादी पदधिकारीची बिनविरोध्द निवड करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या