बिलोली दत्त जन्म महोत्सव व जयंतीसाठी अधिकाऱ्यांंची उपस्थिती ; भंक्तांनी महाप्रसादाचा लाभ व याञेचा आनंद घेतला !

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
आनंद दत्त मंदिर, दत्त टेकडी बिलोली येथे दि.७ डिसेंबर २०२२ रोजी दत्त जन्म उत्सव जयंती साजरी करण्यात आली. सदरिल या दत्त जयंतीसाठी बिलोली तालुक्यातुन बंधु भगिणी येत असुन येथे याञा भरत असल्यामुळे मोठे आकाशपाळणे, खेळणींसह मिठाई म्हणून प्रसादाची दुकाने थाटलेली पहायला मिळाली.

या दत्त जयंतीसाठी शहरातून महाप्रसादासाठी शेतकरी, व्यापारी व अन्य नागरिकांनी व्यवस्था करण्यात आली. दत्त भक्तांनी महाप्रासादाचा लाभ घेतला. दत्त मंदिराच्या समितीने पदाधिकारी सर्व भक्तांचे स्वागत केले.
या दत्त जयंतीच्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून बिलोली चे उपविभागीय अधिकारी मा.गिरी, तहसीलदार श्रीकांत निळे, जिल्हा उपरुग्णालय बिलोली अधिक्षक मा.नागेश लखमावाड, नायब तहसीलदार आर.जे.चौहान, नरावाड, माजी नगरध्यक्ष संतोष कुलकर्णी, दत्त मंदिर समितीचे अध्यक्ष मा.सुभाष पवार, माजी नगराध्यक्ष रणवीर सिंह चौहान, माजी नगराध्यक्ष मा.नागनाथ तूमोड, माजी नगराध्यक्ष मा.विजय कुंचनवार, भाऊ बिलोलिकर, अर्जुन दादा खंडेराय, गंगाधर खंडेराय, राजू सावकार, शेट्टी सावकार माजी नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, यांच्या महिला, नागरिक, बालक हजारोंच्या संखेने दत्त भक्त उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या