विजयकुमार कुंचनवार यांच्या पुढाकारातून बिलोलीकरांचे स्वप्न होणार साकार !!
( बिलोली प्र. सुनील जेठे…)
बिलोली तालुका हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सर्वात टोकाचा तालुका असुन सर्वात जुना तालुका म्हणून ओळखला जातो असे असले तरी बिलोली तालुक्याचे विभाजन होऊन नायगाव व धर्माबाद नंतर निर्माण झाले मात्र बिलोली तालुका मागासच राहीला बिलोली शहर व परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी सकारात्मक भुमीकेतुन बिलोली चे माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांनी सतत पाठपुरावा करत विषयाला लावुन धरत सात ते आठ वेळा मंत्रालय वारी केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ऊदय सामंत यांनी विजयकुमार कुंचनवार यांच्या समवेत पत्र व्यवहार करुन शिष्टमंडळाची मुंबईत दि २७ रोजी बैठक लावली सदर बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा संपन्न झाली.
यावेळी मंत्री महोदयांच्या दालनात औद्योगिक विकास महामंडळाच्या मराठवाडा प्रमुख यांच्या सह बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी तहसीलदार श्रीकांत निळे मधुकर गिरगावकर माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, माजी नगराध्यक्ष सुभाष पवार, भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष राजकुमार गादगे सोशल मीडिया तालुका अध्यक्ष साईनाथ शिरोळे भाजपा कार्यकर्ते राहुल मामडे यांची प्रमुख उपस्थिती होती भविष्याचा वेध घेता उद्योगाच्या दृष्टीने मागास असलेल्या बिलोली तालुक्यात औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाल्याने अनेक बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण यशस्वी ठरु अशी प्रतिक्रिया विजयकुमार कुंचनवार यांनी दिली सकारात्मक चर्चा करुन बिलोली शहरात विकासात्मक काम प्रगतीपथावर घेतल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy