बिलोली पोलीस ठाणे चे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक मा. अनंत नरुटे यांनी स्विकारला पदभार ; माजी नगराध्यक्ष मा. भिमराव जेठे यांनी पुष्पगुच्छ देऊन केल स्वागत.

🔻 शहर व तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मा.अनंत नरुटे यांचे केले स्वागत ..
[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली पोलीस ठाणे येथे दि.९ डिसेंबर २०२२ रोजी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक मा.अनंत नरुटे यांनी पोलीस ठाणे चा पदभार स्वीकारला. हि माहिती कळताच बिलोली नगरीचे माजी नगरध्यक्ष मा.भिमरावजी जेठे यांनी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक मा.अनंत नरुटे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन पुष्प देऊन सत्कार केला.

बिलोली पोलीस ठाणे चे माजी पो.नि.शिवाजी डोईफोडे यांची बदली कंट्रोल रुम नांदेड येथे झाल्यामुळे बिलोली ठाणेचे नवनिर्वाचित पोलिस निरिक्षक मा.अनंत नरुटे हे नांदेड येथे नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते. मा.नरुटे यांनी बिलोली ठाणेचा पदभार स्विकारला असता शहर व तालुक्यातील कार्यकर्ते येऊन नरुटे यांचा सत्कार करीत आहेत.

यावेळी बिलोली न.प.चे माजी नगरसेवक अमजद चाऊस, व सामाजिक कार्यकर्ते इलियास पठाण यांच्यासह ए.पी.आय.बोधणे, बिट जमदार चंद्रमुनी सोनकांबळे , पो.काॕ.आर.एन.मुदीराज आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
तद्नंतर बिलोली ठाणे चे नवनिर्वाचित पो.नि.मा.नरुटे यांनी बिलोली ठाणेला रुजू होऊन पदभार स्विकारलेले वृत्त कळताच भाजपाचे व शाहरातील कार्यकर्ते, पञकार व युवकांनी नवनिर्वाचित पो.नि. मा.नरुटे यांचा पुष्प हार व पूष्पगुच्छ देऊन सत्कार केले.
यावेळी बिलोली प,स.चे माजी सभापती बोधणे, न.प.चे नगर सेवक यशवंत गादगे, भाजपाचे ता.अध्यक्ष श्रीनिवास पा.नरवाडे, युवा तालुका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, राजु गादगे, भाजपा कार्यकर्ते बाबू पञकार सुनिल जेठे, साईनाथ शिरोळे, शुभम निदाने यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या