मुकबधीर मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्या शिवबा संघटनेची मागणी !
( नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी )
– बिलोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल च्या पाठीमागे काटेरी झुडपात नवी आबादी झोपडपट्टी येथील मूकबधिर मुलीवर बलात्कार करून तिला दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान उघडकीस आली.
पीडित मुलगी संध्याकाळी शौचास गेली असता येथील काही नराधमांनी तिला पकडून तिच्यावर बलात्कार केला व तिला त्याच जागी पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली.
पीडित मुलीला आई-वडील नसून ती आपल्या बहिणीकडे राहत होती. मोठी बहीण शेतात मोलमजुरी करून आपला व तिचा उदरनिर्वाह करत होती.
बिलोली शहरातील ही पहिलीच घटना नाही. मातंग समाजाच्या मुकबधीर मुलीवर बलात्कार करून निघृणपणे तिथे डोकं व तोंड ठेचुन हत्या केल्याची घटना ही अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
या घटनेमुळे बिलोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पारित केलेल्या दिशा कायद्यानुसार 21 दिवसात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, सदरील खटल्यात राज्य सरकारच्या वतीने तज्ञ व नामांकित वकिलाची नेमणूक करावी. अशी मागणी शिवबा संघटना बिलोली शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर योगेश्वर माधवराव पाटील जाधव -तालुका अध्यक्ष, हनुमंत तुकाराम पाटील दिगंबर पाटील बोगरे -तालुका उपाध्यक्ष, अंकुश बालाजी ढगे -नायगाव तालुका सचिव, साईनाथ गणपतराव कानोले -नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख, व्यंकट मोहनराव पाटील जाधव- शाखाप्रमुख दुगाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.