बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल इमारतीला मोठी आग ; बिलोली न.प.अग्निशामक वाहन यंञनेमुळे आग अटोक्यात.

[ बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे ]
शाळेतील एक रुम मध्ये असलेले फंगार मोडके तोडके बाक, टेबल व सामानास भीषण आग लागल्याने आगीचा मोठा भडका उडाला. यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दीपावलीच्या सुट्टया असल्यामुळे येथे विद्यार्थी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही. ही बाब शिक्षण विभागाने लक्षात घेऊन येथील कर्मचाऱ्यांना तंबी द्यावी असे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी म्हणाले.
जिल्हा परिषद हायस्कूल शाळा ही बिलोली तालुक्यात नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. या प्रसिध्द असलेल्या शाळेतुन विद्यार्थी मोठमोठ्या पदावर पोहोचले आहेत.
या जि.प.हायस्कूल शाळेला आग लागली असता शहरातील नागरीक व आजी – माजी विद्यार्थ्यांनी वेळीच लक्ष देऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. बिलोली व कुंडलवाडी न.प.ला कळवताच अग्निशामक वाहने घटनास्थळी पोहोचले व आग अटोक्यात आणली.
यावेळी आग विझवण्यासाठी न.प.माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, नगरसेवक यशवंत गादगे, नगरसेवक अमजत चाऊस, सामाजिक कार्यकर्ते वलिओदीन फारुखी, पो.नि.शिवाजी डोईफोडे, स.पो.नि.केंद्रे, पोलिस कर्मचारी सह नागरीक घटनास्थळी होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या