बिलोली शहरातील बंद असलेले पथदिवे तात्काळ चालू करण्याची मागणी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
 बिलोली शहरातील मुख्य रस्त्यावरील पथदिवे बऱ्याच दिवसापासून बंद असल्याने शहरात अंधार पसरलेले आहेत. त्यामुळे चोऱ्या व अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान उपवासाचा महिना येणाऱ्या 3 तारखे पासुन सुरू होत आहे .10 तारखेला श्री राम नवमी, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे.
शहरात अंधार पसरलेला आहे. तसेच शहरात वेळेवर पाणी पुरवटा व स्वच्छता होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शहरात व राज्य महामार्गावरील व गल्लीतील पथदिवे चालू करणे गरजेचे आहे. बंद असलेले पथदिव्य चालु करण्याची मागणी काल 31 मार्च रोजी बिलोली न.प मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनावर माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचणवार, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या