बिलोली तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कार्यकारिणी जाहीर.

■ तालुका अध्यक्ष पदी रमेश बालकोंडेकर तर कार्याध्यक्षपदी उमेश भाले यांची बिनविरोध निवड.

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]

माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी रमेश बालकोंडेकर तर कार्याध्यक्षपदी उमेश भाले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
बिलोली येथील विद्यानिकेतन मुलींचे हायस्कूल येथे दि. 27 मार्च रोजी नांदेड जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव पेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी रमेश बालकोंडेकर तर कार्याध्यक्षपदी उमेश भाले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच तालुका उपाध्यक्ष पदी विजय लोहगावकर, रामेश्वर गिरी, सौ.छाया यरकलवाड,किरन उप्पलवार, कार्यवाहपदी गंगाधर पापुलवार , कोषाध्यक्ष शेख खुदुस, प्रसिद्धी प्रमुख नागोराव लोलापोड, सहसचिवपदी लक्ष्मण इबतेवार, सहकार्यवाह लक्ष्मण मामीडवार, संघटक शाम पवार तर सदस्यपदी हरीदास मुंढे, लिंगागोड इबीतवार, गंगाधर ठक्करवाड, गंगाधर वाडेकर, शुभम मुस्कावाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी नांदेड जिल्हा कार्यकारिणीचे कार्यवाह मोहम्मद फारुख पाशा, उपाध्यक्ष लक्ष्मण कोपरे माचनूरकर, कोषाध्यक्ष आनंद धुप्पे, राजेश्वर कनकमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बिलोली तालूक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना विभागिय कार्यवाह विजयराव देवडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या