गुरुवारचा आठवडी बाजार नगर परिषद समोर भरवण्याची मागणी !

[ प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली शहरात मुख्य ठिकाणी असलेल्या गुरुवारचा आठवडी बाजार नगर परिषद समोर भरत होता. रविवार आठवडी बाजार नविन बसस्थानक  परिसरातील देशमुख नगर, साठेनगर, गांधीनगर, भास्कर नगर, गंगानगर, सिद्धार्थ नगर इतर भागातील नागरिकांना बाजार दुर होत आहे.
सदरील बाजार नगर परिषद समोर भरवण्यात यावा, अन्यथा येणाऱ्या 7 एप्रिल रोजी नगर परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा मुख्याधिकारी चौधरी यांना निवेदन द्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत तुडमे, सय्यद रियाज, शेख पाशा गादिवाले, सय्यद अहेमद, प्रतिक अंकुशकर राजु बोईनवाड, संतोष बिंगेवार, गजानन भोगाजे, शेख महेमुद, शेख पाशा, मोहन मुंडकर, सह अनेकांच्या स्वाक्षरी आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या