सामाजिक बांधिलकी जोपासत क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील मन्नेरवारलू समाज बांधवांच्या वतीने क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आज दि.१७ नोव्हेंबर गुरुवारी सांयकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील पोचम्मादेवी मंदिराजवळ मन्नेरवारलू समाज बांधवानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावरून क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

विशेष म्हणजे बिरसा मुंडा यांच्या जयंती मिरवणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जाणता राजा म्हणून ओळख असलेले छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरूषांच्याही तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजविण्यात आले. या जयंती मिरवणुकीत शहरातील मन्नेरवारलू समाज बांधवासह इतर समाजातील लोकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.तसेच कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या