बिलोली येथे क्रांतीविर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !

[ बिलोली ता.प्रतिनिधी – सुनिल जेठे ]

मनेरवारलू समाजासाठी बिरसा मुंडा यांनी केलेल्या कार्याबद्दल लक्ष्मण शेट्टीवार यांनी व्यक्त केल मत.

सर्व जाती धर्माच्या मिञमंडळीनी एकत्र येत बिरसा मुंडा यांची जयंती जल्लोषात साजरी केली. बिलोली शहरात दि.२७ नोव्हेंबर रोजी कन्या शाळा येथुन क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची भव्य जयंती मिरवणूक पारंपारिक अदिवासी वेशभुषा परिधान करुन नृत्य करत मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व जाती धर्माचे असलेले नागरिक व न.प.चे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, माजी नगरसेवक, लक्ष्मण शेट्टीवार, तलाठी पवण ठक्करोड यांच्यासह  गंगाधर पोपूलवार यांच्या शालेय विद्यार्थी व अदिवासी पोषाखातील नृत्यकारांनी जल्लोषात नृत्य करत जयंती साजरी करण्यात आली.

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या