कामगार संघटनेच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील कुंडलेश्वर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने पोच्चम्मा मंदिर येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण, जेष्ठ पत्रकार कल्याण गायकवाड, सुभाष दरबसत्तेवार, अमरनाथ कांबळे, संतोष शिवशेट्टे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी. वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद माहुरे, कल्याण गायकवाड, विलास दिवशीकर, हनमलु गोनेलवार, वसंत स्वामी, सुभाष दरबसत्तेवार, अमरनाथ कांबळे, अशोक हाके, संतोष शिवशेट्टे, दिगंबर लाडे, सुगत नंदूरकर आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष सय्याराम मुकेरवार, तालुका सचिव शंकर बिरमवार, तालुका शहराध्यक्ष सिद्राम मुक्केरवार, तालुका शहर सचिव श्रीकांत बोलचटवार, शहराध्यक्ष रमेश जायेवार, गौतम वाघमारे, रमेश पेंटावार, अहमद मिस्त्री, शिवराम कोलंबरे, आयुब मिस्त्री, इसाक मिस्त्री, राम गनारकर, रमेश पालकुर्तीवार, साईनाथ शक्करकोट, शिव जायेवार, नागेश तेलकेश्वर, नारायण पोरडवार, राजु जक्कावार, राजू सोमावार, राजू पुप्पलवार, गंगाधर नामसवार, रवि कम्ममवार, राजु जक्कावार, नारायण पोरडवार, शिवकुमार जायेवार, पोचीराम गांजरे, शिवा मोकळे, गंगाधर हमंद, सुरेश बिरमवार, सतिश हमंद, राजेश मोरे, रमेश ब्यारमवार आदी कामगार उपस्थिती होते.
www.massmaharashtra.com

युट्युब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी फोटोवर क्लिक करा.

ताज्या बातम्या