आदिवासी जननायकास विनम्र अभिवादन- प्रा.नितिन दारमोड

आद्य क्रांतीकारक तथा आदिवासी जननायक, उलगुलान चळवळीचे नायक शहीद बिरसा मुंडा यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

उलिहातु-बामबा (झारखंड) येथे वास्तव्यास असलेल्या कर्मी आणि सुगांना मुंडा या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला. परकीय जुलुमशाहीतून देशाला मुक्त करण्यासाठी भारत भूमीचा आद्य रहिवाशी असलेला आदिवासी समाज पुढे आला.पुढे उलगुलान चळवळीचा उदय झाला.

( उलगुलान-सर्व स्तरातून एकाचवेळी केलेला उठाव) इसाई धर्म स्वीकारलेल्या कुटुंबात बिरसा लहानाचा मोठा झाला.1886 साली जर्मन मिशनच्या स्कुलमध्ये शिक्षण झालं. पुढे थोडेफार शिक्षण घेऊन बिरसाने इसाई धर्माचा त्याग केला. मूळ मुंडा संस्कृतीत परत आला.ब्रिटिशांची आंतरभारतीय सरंजामशाही,जमीनदार, व्यापारी, भांडवलदार आणि सनातनी प्रस्थापित व्यस्थेच्या विरुद्ध लढा उभारला. विघटीत आदिवासींना संघटीत करून गमावलेला हक्क आणि अधिकाराचा नवा मूलमंत्र देऊन उलगुलानचा नारा पुकारला.

पवित्र भावनेने बिरसा मुंडा यांनी निसर्ग धर्म(बिरसाई) या नव्या धर्माचा प्रसार करण्याचा बेत आखला. त्याने आदिवासींसाठी नवीन नियम प्रचलित केले उदा:-चोरी करू नये, खोटे बोलू नये, हत्या करू नये, कर्मकांड बंद करा,दारूचे सेवन बंद करा, मुंग्याप्रमाणे सतत परिश्रम करा, सर्वांवर प्रेम करा इत्यादी. त्यामुळेच बिरसा आदिवासीचा धरती आबा ठरला.

इंग्रजां सोबत लढताना बिरसाना तुरूंगात डांबून ठेवले होते पण लगेच बिरसाची सुटका झाली.1898 साली तणगा नदीच्या काठी बिरसा सैनिक आणि इंग्रजी फौजा यांच्यात तुंबळ लढाई झाली यात बिरसा विजयी झाला होता. बिरसाने 09 जानेवारी 1900 ला डोंबारी टेकडीवर सर्व आदिवासींना बोलावून एक व्यापक सभा घेतली होती त्यातच इंग्रज सरकारने एक कुटनीती आखली आणि स्वकीयांनी केलेल्या दगाबाजीमुळे बिरसा इंग्रजांच्या हाती लागला. तोपर्यंत बिरसा आदिवासींचा भगवान झाला होता.पण स्ट्रीटफिल्ड व जेलर अँडरसन यांच्या संगनमताने बिरसाला कालराचे इंजेक्शन लाऊन 09 जून 1900 ला खून करण्यात आला.निधड्या छातीचा तीरकमठा हातात घेऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढणाऱ्या बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा विनम्र अभिवादन….

🙏🙏🙏🙏🙏🙏


– प्रा. नितीन दारमोड

ताज्या बातम्या