भारतीय स्वातंत्र्याचा 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती कार्यालय म्हसळा क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट !

[ रायगड / म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त औचित्य साधून शिक्षक संघटना कर्मचाऱ्यांकडून महान क्रांतीकारक स्वातंत्र सेरनानी बिरसा मुंडा यांचे देशाप्रती असलेले त्यागाचे बलिदानाचे कार्य येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारे असल्या मुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समिती म्हसळा कार्यालयाला क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची प्रतिमा भेट देण्यात आली.

या वेळी उपस्थित पंचायत समिती म्हसळा चे मा.श्री.डी.एन दिघीकर साहेब विस्तार अधिकारी पं.स, श्री.एच.बी. इंदुलकर सहायक प्रशासन अधिकारी, श्री एम जी साळी कृषी अधिकारी प. स, श्री एच. एम. परकाळे विस्तार अधिकारी सांख्यिकी, श्री राजेन्द्र ढंगारे ता. कृषी अधिकारी, श्री एच एम माळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी, श्री आर बी दवट वरिष्ठ सहायक होते, श्री एम जी साळी साहेब यांनी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयी उजाळा दिला व मार्गदर्शन केले.
श्री एच बी इंदुलकर साहेब यांनी आपल्या मनोगतातून मुंडा यांचे कार्य आणि त्यांनी केलेला त्याग देश प्रेम विषयी विचार मांडले व शालेय स्तरावर येणाऱ्या काळात चांगल्या प्रकारे जयंती साजरी करण्यात येईल त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
श्री एम जी परकाळे साहेब यांनी खूप चांगल्या प्रकारे बिरसा मुंडा यांचे जीवना विषयी विचार मांडले. या वेळी उपस्थित शिक्षक कर्मचारी श्री उद्धव खोकले, श्री प्रकाश बुलबुले, श्री देवराम डावखर,श्री मारुती खोकले, श्री वसावे संजय, श्री कांबडी डी एस श्री अनिकेत दर्गे, श्री महेंद्र गायकवाड, श्री हरेश गिरे, श्री धनेश सराई, श्री प्रा. अंगद कांबळे श्री कांबडी सर, श्री गवळी सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नामदेव पवार यांनी केले व आभार श्री देवराम डावखर यांनी मांडले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या