चिरंजीवाचा वाढदिवस शासकीय रुग्णालयात फळे वाटप करुन साजरा !

सेवेचा वसा पिढीला देणे दायित्व – सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ
नायगांव /प्रतिनिधी :
दि.२७ सप्टेंबर वाढदिवस हा कौटुंबिक पातळीवरचा उत्सव जेव्हा समाजउपयोगी मदत कारणी पडतो तेव्हा तो उत्सव कौटुंबिक नाही तर सामाजिक ठरतो.

अविरत समाजसेवेचा वसा घेतलेल्या सामान्यांतील असामान्य सामाजिक कार्यकर्ते- शिवानंद पांचाळ नायगांवकर यांचा मुलगा कु.शिवांश याच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगांव येथील शासकीय ग्रामिण रूग्णालयातील रूग्णांना फळें वाटप करून मुलाचा वाढदिवस समाज सेवेला आर्पित केला.
सामाजिक बांधिलकी असलेले शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांनी आपल्या साथीरांना सोबत घेऊन नेहमी कोणते ना कोणते सामाजिक उपक्रम गरजवंतासाठी घेत असतात, यांनी समाजभान जपत कार्य करत आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या