पाळीव कुत्र्याचा वाढदिवस धूमधडाक्यात केला साजरा : कुंडलवाडीकर परिवाराच्या श्र्वान प्रेमाची परिसरात चर्चा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
          जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या पाळीव प्राण्यांवर मनापासुन प्रेम करतात. जगात लाखो लोकांना त्यांचे पाळीव कुत्रे सर्वस्व आहेत. लहान मुलांपासून ते जेष्टपर्यंत कुत्र्याचे लाड करत असतात. कुंडलवाडी येथील रहिवासी हर्ष कुंडलवाडीकर यांच्या पाळीव श्र्वानाच्या वाढदिवसाची चर्चा होत आहे.
        हर्ष कुंडलवाडीकर हे अनेक वर्षापासून वेगवेगळया जातीचे पाळीव श्र्वान पाळतात. लॅब, जर्मन शेफर्ड, पोमोलियन,डॉबरमन जातीचे पाळीव श्र्वान पाळलेले आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तेवढ्याच आवडीने मदत करतात. कुंडलवाडीकर यांच्याकडे सध्या असलेल्या बिगल जातिची “लिया”नामक कुत्री आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी जत्रा असलेल्या माळेगाव जत्रेमध्ये श्र्वान स्पर्धेत आकर्षक असलेल्या लिया चा प्रथम क्रमांक आलेला आहे .त्याच्या आहाराची,स्वच्छतेची कुटुंबातील प्रत्येक सदस्य काळजी घेत असतात.
येवढेच नाही तर दरवर्षी १५ जुलै रोजी तिचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करतात. यंदाही कुंडलवाडीकर यांनी लिया च्या पाचव्या वाढदिवसानिमित्त बॅनर डिझायनिंग केले व प्रकाशित केले. त्यांच्या श्र्वान प्रेमाला मित्रपरिवाराने भरभरून प्रतिसाद देत सोशल मीडिया वर लियाच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छाचा वर्षाव झाला. फक्त बॅनर बाजी न करता केक कापून व गल्लीतील कुत्राना बिस्कीट वाटप करून वेगळ्या पद्धतीनें आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या वाढदिवस साजरा केला. आजघडीला कार्यकर्ते राजकारण्यांचे भले मोठे होर्डिंग्ज लावून फक्त गाजावाजा करतात मात्र कुंडलवाडीकर कुटुंबाने त्यांच्या या मुक्या पाळीव प्राण्यांचे जोरदार वाढदिवस साजरा करत असल्याने त्यांच्या प्राणी प्रेमाची चर्चा कुंडलवाडी शहर तथा परिसरामध्ये होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या