जेष्ठ व्यापारी श्री रामभाऊ सुभाष शिंदे यांचा वाढदिवस साजरा !

[ रायगड /म्हसळा प्रतिनिधी प्रा. अंगद कांबळे ]

उमरगा येथील प्रसिद्ध भांड्याचे व्यापारी आणि समाज सेवक श्री. रामभाऊ सुभाष शिंदे यांचा 48 वाढदिवस त्यांच्या मित्र परिवारांकडून दि. 07/11/2021 रोजी साजरा करण्यात आला.

श्री.रामभाऊ शिंदे हे समस्त उमरगा तालुक्यात एक नावाजालेले, आणि परीचित असे नाव आहे ते म्हणजे त्यांच्या शांत बोलक्या स्वभावामुळे “ग्राहक ” हे आपले मूळ आधार आहे असे समजून त्यांना समजूनघेऊन त्यांच्याशी व्यवहार करत असे.

वेळप्रसंगी गरीबकुटुंबाला लग्न असेल तर बिंदास्त पणे मोकळ्या मणाने मदत करत कोणत्याही जाती धर्माचा असो कारण असो परजन असो रामभाऊ त्या ठिकाणी हजर असत आणि मदतीसाठी सदैव ते नेहमी पुढे राहतात. आपल्या मुलांना ही पुढे हीच शिकवण दिली आहे सचिन, संदीप, हे व्यापारात रामभाऊनां मदत करत असतात तर लहान मुलगा इंजीनियर चा कोर्स करत आहे अश्या या दिलदार व्यक्तिमत्वाच्या रामभाऊंना वाढ दिवसा निमित्ताने खुप शुभेच्छा.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या