जनमाणसांमधील ओजस्वी आणि तेजस्वी नेतृत्व डॉ. मीनलताई निरंजन पाटील खतगावकर !

[ डॉ. नरेश सत्यभामा देविदासराव बोधनकर ]
संपर्क – 7304140654 ✍️
[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे )
वनीने सृजनतेला जन्म दिला मनुष्य रुपात अशातच आरिस्टॉटलचा एक सिध्दांत आठवतो, ते म्हणतात की माणसांच्या अस्तित्वाच्या दोन अवस्था असतात, एक म्हणजे अणू अगदी लहानापासून लहान आणि दुसरी म्हणजे अवकाश म्हणजे अगदी अथांग अशी, पण या दोन्हीही अवस्थेतून जगताना माणूस आपलं विलक्षण आयुष्य ३ टप्यांत व्यथित करतो कधीच न कळणार बालपण, कळून सुध्दा चुकणारं तरुणपण आणि कळल्यानंतरही काहीच न करता येणारं म्हातारपण अशा तिन्हीही टप्यांतील लोकांच्या मनात आपल्या नैतिकता, नितीमत्ता, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचा ठसा उमटवत श्वासापासून ते मृत्यूपर्यंतचं आपलं आयुष्य म्हणजे इतरांच्या, जनतेच्या विकासाचं भांडवल आहे’ असे माणून इतरांसाठी तन, मन, धनांनी झटणारं असं एक तेजस्वी आणि ओजस्वी व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ. मीनलताई निरंजन खतगावकर.
काही माणसं जन्मताःच मोठी असतात काही माणसांवर मोठेपणा हा लादला जातो, पण काहीच माणसं स्वकर्तृत्वाने समाजाच्या मोठेपणासाठी झटत असतात असं समाजासाठी त्यांच्या हितासाठी प्रश्नांसाठी लढणारी लढवण्या म्हणजे डॉ. मीनलताई पाटील खतगावकर आपला या लोकांवर किती प्रभाव आहे. यापेक्षा आपला स्वभाव यांच्यासाठी दिलदार असला पाहिजे असं माणून सच्च्या मनाने कार्य करणारी कार्यमेरु म्हणजे आदरणीय डॉ. मीनल ताई पाटील खतगावकर मा. जिल्हा परिषद सदस्य नांदेड .           
समतेच्या दिव्यात, ममतेचा प्रकाश एकूण समान हक्कांच्या कवचकुंडात सर्वसामान्य माणसाचं भय, भुख भाकरिचा प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असणारी कार्यसम्राट म्हणजे डॉ.मीनल ताई पाटील खतगावकर, जणु सुर्याशिच करार करतात आणि म्हणतात. सूर्या तु तिथे तळपं। मी इथे तळपती। तु ताऱ्यांना संभाळ। मी माझ्या साऱ्याच गरीब दिन दलित माझ्या माऊलींना संभाळते.
इथल्या बंडखोरी अन्याय अत्याचार, यासारख्या गोष्टींवर हातत समशेर घेवून, घाला घालणारी व प्रत्येक स्त्रीला सक्षम सबला होवून जगण्याचा अधिकार आहे आणि तो सन्मान त्यांना मिळायला हवा. यासाठी स्त्री सबलीकरणारावर भर देवून प्रत्येक पुरुषाच्या मनात स्त्री सन्मानाची अस्तेची ज्योत पेटवून, तरुणांच्या मनगटात देशसेवेची निष्ठा भरणारी देशभक्त म्हणजे ताईसाहेब समाजाच्या दुःखाशी नाती सांगणाऱ्या डॉ.मीनल ताईना दशकांची कुंपण कधीच आडवी आली नाहीत. ते स्वतःच्या दुखाला कुरवाळत बसले नाहीत ते स्वतःच्या व्यथांना गोंजारतही बसले नाहीत तर ते आले. या दुःखांना भावनांना तोंड देत आणि उजळून काढल्या त्यांनी या अंधारलेल्या रात्री आणि दुःखी झालेल्या मनांना स्वतःच्या व्यक्तीगत आयुष्याचा होम करुन, असं कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम असणारी व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय डॉ.मीनल ताई पाटील खतगावकर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी एक कला , सुप्त गुण असतात.
दैविगुण असतात आणि अशा गुणांना संधी मिळावी म्हणून स्वतः जन माणसांचा सेवक म्हणून प्रत्येकासाठी व्यासपीठ निर्माण करून देणारी निष्ठावंत दुवा म्हणजे नावाप्रमाणेच डॉ. मीनल ताई पाटील खतगावकर कला-क्रीडा- साहित्य-संस्कृतीच्या पुनरुज्यीकरणासाठी बळकटीकरणासाठी वेगवेगळ्या क्रीडास्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबीर, क्रिकेट अशा अनेक स्पर्धा भरवणारी साहित्य प्रेमी म्हणजे आदरणीय ताईसाहेब .
ताईसाहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी इथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी आंदोलन उभं केलं , ताईसाहेब वडीलधाऱ्या माणसाचा खूप आदर राखतात ते त्यांना भेटल्यावर स्मित हास्य देत आशीर्वाद घेतात, न चुकता राम -राम सुद्धा करतात , प्रश्न पडतो ताईसाहेबांनी राम -राम का बरं करतात.. याचा शोध घेतल्यावर असं समजतं ताई साहेबांचं म्हणणं आहे इथल्या, माझ्या जनतेच्या सेवेत त्यांच्या कामात, मला नेहमीच राम दिसतो. व्यक्तींमध्ये देव शोधणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ताईसाहेब ,स्वतः माणसांचे डॉक्टर असून ताईसाहेब समाजाचे सुद्धा एक डॉक्टर आहेत. किंबहुना निसर्गाचे सुद्धा डॉक्टर आहेत त्यांनी पर्यावरण संतुलन राहावं यासाठी अनेक वृक्षरोपण व वृक्षांचं संगोपन सुद्धा नेहमी करत असतात भुमिती मधले काटकोन चौकोन त्रिकोण यापेक्षा ताईंसाठी, महत्वाचा वाटतो तो म्हणजे दूरदृष्टीकोन..
दृष्टीकोण हा भूमितीत, शिकवला जात नाही. तो आपल्या विचारांवर , आपल्या भूमिकेवर पाहण्यास दिसतो. ताईसाहेबांनी शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या सांगितल्यावर ताईसाहेब त्या समस्येसाठी स्वतः समोर येऊन त्या वादळांना तोंड देतात आणि मार्ग काढतात आणि दिशा दाखवतात या तरुण पिढीला. आहो सोपं नसतचं उन्हात उभं राहुन दुसऱ्यांना सावली देणं, घराचं घरपण जपत, सावलीचीही माऊली होणं, अशी माऊली जी स्वतःच्या अंगावर समस्यांचं उन झेलून आपल्या प्रत्येक माणसांवर विकासाची सावली टाकणारी महामेरु डॉ. मीनल ताई पाटील खतगावकर, त्यांना वाटतं की माझ्यामुळे जर कोणाला डोळ्यात पाणी आलं तर ते जीवन व्यर्थ आहे.
माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी आलं तर ते जीवन सार्थ आहे. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून अविस्मरणीय सार्थ जीवन जगणाऱ्या या उदात्त व्यक्तीमत्वाबद्दल शेवटी इतकच लिहितो, वाऱ्याचा वेग ओळखू येतो, कारण जो तो इथे अट्टल आहे. वाऱ्याचा वेग ओळखू येतो, कारण जो तो इथे अट्टल आहे, सत्तेचा गजर कोणताही असला तरीही आदरणीय डॉ.मीनल ताईसाहेब हेच खरे विठ्ठल. म्हणूनच म्हणावं वाटतं की, जीवन जगताना अनेक लागतात फॅक्टर, इथल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात मीनल ताई डॉक्टर. ताई साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो..                                                     
(डॉ. नरेश सत्यभामा देविदासराव बोधनकरसंपर्क. 7304140654)
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या