माजी खासदार खतगावकर यांचा साध्या पद्धतीने कार्यकर्त्यांकडून वाढदिवस साजरा

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांचा वाढदिवस लोकप्रतिनिधी सह कार्यकर्त्यांनी सध्या पद्धतीने साजरा केला.

मराठवाडा सह नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळल्याने नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार तथा माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या वाढदिवस बॅनर बाजी, जाहिरात बाजी न करता साध्या पद्धतीने लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी साजरा केला खतगावकरांना शुभेच्छा देण्यासाठी डी पी सावंत,अमरभाऊ राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश जी पोकर्णा, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, मीनलताई खतगावकर,संजय देशमुख लहानकर,राजेश पावडे , आनंद चव्हाण दीपक पावडे , अडवोकेट बाळकृष्ण शिंदे सुरेंद्र घोडजकर,संभाजी पाटील भिलवंडे, सदाशिवराव धर्माधिकारी, मनोज पाटील मोरे, गंगाधर सोंडारे,,बालाजीराव मदेवाड, माधवराव कंधारे ,गजानन चौधरी , शेख बबलू ,विजय देवदे, दत्तात्रय आईलवार, या सह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार,मोहना हंबर्डे, यांनी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांना मोबाईल वरून शुभेच्छा दिल्या.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या