कार्ला बु येथील झाडांचा वाढदिवस केला साजरा !

बिलोली तालुका शिक्षक सेनेचा आदर्श उपक्रम !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
आजकाल वृक्ष लागवड करून निव्वळ फोटोसेशन करण्याचा प्रकार असल्याचे बोलल्या जाते.माञ बिलोली तालुक्यातील शिक्षक सेनेच्या वतीने गत वर्षी २७ जुलै रोजी लागवड केलेल्या वृक्षांचे वर्षभर संगोपन करून यंदा त्या वृक्षांचा दि.२७ जुलै रोजी वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श उपक्रम राबवला आहे.वृक्षांचा वाढदिवस साजरा करणे ही प्रेरणादायी संकल्पना आहे.असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी आँनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डाँ.सविता बिरगे,गावच्या सरपंच शिल्पाताई खेळगे ,जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर,गट शिक्षण अधिकारी बि.एम.पाटील,शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांची प्रमुख तर गंगाधर ढवळे,शंकर हमंद,मु.अ.विठ्ठल चंदनकर,शा.व्य.समितीचे अध्यक्ष शिवराज मेंढगुळे,ग्राम पंचायत सदस्य हणमंतराव मिनके,मारोती कांबळे,मारोती बायनोर,बंडू पा.भोसले,संजय गंजगुडे,शंकर हासगुळे,फारूखी सर,पांचाळ सर, संतोष किसवे गुनवत्ता समन्वयक तथा प्रसिद्धी प्रमुख शिक्षक सेना नांदेड, शोभा तोटावार, शामला देशपांडे, विषय तज्ञ गुणवंत हालगरे, सुरेश राठोड, प्रल्हाद ढाकणे, श्रीनिवास मंगणाळे, विशेष शिक्षिका सविता शिरशेठवाड यांची विशेष उपस्थिती होती.
यासमयी गत वर्षी शिक्षक सेनेचे ता.अध्यक्ष बालाजी गेंदेवाड यांच्या संकल्पनेतुन कार्ला बु येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या वर्षपुर्ती निमित्त वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.विशेष म्हणजे या वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करणाऱ्या केंद्र प्रमुख मडगलवार सर,मु.अ मनोहर शिरगीरे सर, वाघमारे सर,सोमपुरे मँडम यांच्यासह गावचे भुमिपुञ बसवन्ना बरबाडे,श्रिकांत मिनके यांचा सत्कार तर कोणत्याही अपेक्षे विना गत वर्षभरापासून येथील झाडांचे संगोपन करणाऱ्या संग्राम मामा यांचा शिक्षक सेनेच्या वतीने अंगभर आहेर देऊन सन्मान करण्यात आला.व तालुक्यातील शिष्यवर्ती व नवोदय परिक्षा उतिर्ण झालेल्या
 कु अक्षरा बसवना बरबडे , कु श्रावणी त्र्यंबक पाटील, कु प्रियांशी सुनील देवकरे, कु स्नेहा देविदास जमदडे विद्यार्थीनींसह त्यांच्या पालकांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यासमयी प्रास्तविकातुन आपले मनोगत व्यक्त करताना बालाजीराव गेंदेवाड यांनी शिक्षक सेनेने केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उद्या पासून सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात संपुर्ण एक महिना खाजगी दुचाकी वाहनाचा वापर न करता सायकलनेच प्रवास करण्याचा संकल्प केला.
व या वर्षी पुन्हा २५० वृक्ष लावणार असल्याचे सांगितले.यावेळी शिक्षण अधिकारी डाँ.सविता बिरगे,जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर,मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.सदर वृक्ष लागवड व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक सेनेचे ता.अध्यक्ष तथा सायकल मँन बालाजीराव गेंदेवाड सर,राजेश कसलोड,शिवराज गागिलगे,शेख सलिम सर,अशोक करवेडकर,गणेश कुर्हाडे,गोपाळ मुत्येपवार,शेख साजीद,यांच्यासह शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रमुख, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या