आमदार पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याकडे रातोळीकरांनी फिरवली पाठ ; मटकाकिंगचा भाजपात प्रवेश !

[ धर्माबाद प्रतिनिधी – चंद्रभीम हौजेकर ]
आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद तालुक्यातील जनतेच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी शहरातील रेल्वे गेट क्रमांक दोनच्या परीसरात बुधवारी दुपारी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते करणार होते. परंतु आमदार राम पाटील रातोळीकर यांनी सदरील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवल्यामुळे अखेर सदरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ता बाबाराव भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला. परंतु यावेळी शहरातील मटकाकिंग श्रीनिवास अंदेलवार यांचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे धर्माबाद येथील बुलढाणा अर्बन बँकेला भेट देण्यासाठी दि.८ डिसेंबर रोजी येणार होते. सदरील संधीचा फायदा घेऊन आमदार राजेश पवार हे धर्माबाद येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या हस्ते उरकून घेणार होते. परंतु किरीट सोमय्या यांचा नियोजित दौरा अचानक रद्द झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे. आमदार राजेश पवार यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा विधापरीषदेचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते करण्याचे जाहीर केले होते. परंतु आमदार राम पाटील रातोळीकर यांनी सदरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
आमदार राजेश पवार यांची फजीती झाली असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. ऐनवेळी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ता बाबाराव भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील काही वादग्रस्त मंडळी सदरील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित असल्यामुळे तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
तसेच यावेळी काही मोजक्या लोकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यापैकी शहरातील मटकाकिंग श्रीनिवास अंदेलवार यांचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यात तीव्र नाराजी पसरली आहे. आमदार राजेश पवार यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघात अवैध धंदे चालू देणार नसल्याचे एल्गार पुकारला होता. पण धर्माबाद येथील आमदार राजेश पवार यांचे अनेक समर्थक अनेक अवैध धंदे चालवित असल्याचे चित्र दिसत आहे.
सदरील समर्थकांना आमदार राजेश पवार यांचे वरदहस्त आहे की काय?अशी चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे. आणखी एका नामांकित मटकाकिंग श्रीनिवास अंदेलवार यांचा भाजपात प्रवेश झाला असून त्या मटकाकिंगचे स्वागत आमदार राजेश पवार व भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य सौ.पुनमताई पवार यांनी केल्यामुळे तालुक्यातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
www.massmaharashtra.com 

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून

ताज्या बातम्या