सिध्दार्थ कांबळे व अनुराधा कांबळे यांचा मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
 कुंडलवाडी शहरातील कै.रामलु मंगल कार्यालय येथे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा.अशोकराव चव्हाण, राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे, माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार सुभाष साबणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संघटक विजयदादा सोनवणे आले असता त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व कुंडलवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार, कुंडलवाडी भाजपा शहराध्यक्ष हानमंलू ईरलावार, पंढरी पुप्पलवार, हर्ष कुंडलवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.०२ एप्रिल रोजी सिध्दार्थ रमेशराव कांबळे व सौ.अनुराधा सिध्दार्थ कांबळे, आसमा जबीन शादुल शेख, शेख शादुल जमालमियाॅ, प्रकाश मोहन वाघमारे, करिश्मा गंगाधर वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेश बद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या