अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून सरसकट मदत द्या – लोहा भाजप तालुकाध्यक्ष शरद पवार

विशेष प्रतिनिधी / रियाज पठान

नांदेड दिनांक 23/9/2020
लोहा तालुक्यात मागच्या काही दिवसापासून जोरदारपणे पाऊस झाल्याने शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे ग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व लोहा येथील सेंटरमधील अपुऱ्या सुविधा दूर कराव्यात अशी मागणी भाजपाचे तालुका अध्यक्ष, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

लोहा तालुक्यात मागच्या आठ-दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे शेतातील पिकांचे पावसामुळे पूर्ण त पीक वाया गेले आहे अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्या बाधित शेतकऱ्यांना ेक्‍टरी 30 हजार रुपये अनुदान द्यावे तसेच लिंबोटी धरण खालील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना देखील शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना पुरेसे साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे कर्मचारी हतबल झाले असून त्यांना किट व शनि टायझर उपलब्ध नाही त्यामुळे येथील सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची और रात्र सेवा करत आहेत ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ प्रशासनाने लोहा येथील सेंटरला लागणारे सर्व साहित्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या