भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा ग्रामीण ची बैठक श्रीकांत जी भारतीय यांच्या उपस्थितीत संपन्न !
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव बाजार तालुका प्रतिनिधी संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली व 15 ऑगस्ट रोजी घरघर तिरंगा हा कार्यक्रम राबवण्याच्या संदर्भात व आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याच्या सूचना संघटन मंत्री श्रीकांत भारतीय व जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिल्या जिल्ह्याच्या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री सूर्यकांता ताई पाटील, माजी मंत्री माधव किनाळकर, ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराचे अध्यक्ष प्रवीण साले, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे, सुधाकरराव भोयर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार, श्रावण पाटील भिलवंडे, राजेश कुंटूरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्याताई रोड राठोड, ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष चित्रलेखाताई गोरे, प्रणिता ताई देवरे, पुनम ताई पवार, देविदास भाऊ राठोड, बाबुराव केंद्रे, लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉक्टर माधव उच्चेकर, संघटन सरचिटणीस गंगाधररावजी जोशी, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्य समितीचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com