देशात भाजप पक्षाकडून सदस्य नोंदणी सुरू आहे.त्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी यात सहभागी होऊन गावा गावात जाऊन जनतेशी संपर्क करून नायगाव तालुक्यात जास्ती जास्त सदस्य नोंदणी करावे तसेच सदस्य नोंदणी करत असताना भाजप सरकारने केलेली कामे व पक्षाची ध्येय धोरणे जनते पर्यत पोहचवा असे आवाहन आ.राजेश पवार यांनी नायगाव येथे केले .
देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील देशभरात व मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे जाळे सर्व दुर आणि व्यापक विनले जात आहे.भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे प्रत्येक गावा सह वाडी ताड्यां पर्यंत पोहचवले जात आहे.यासाठी भाजप कडून सदस्य नोंदणी सुरू करण्यात आले आहे .या अनुषंगाने आ.राजेश पवार व पुनमताई पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी येथील भाजप कार्यालयात बुथ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली .
या बैठकीत आ.राजेश पवार म्हणाले की पक्षाच्या आदेशानुसार तालुक्यातील बुथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजप सदस्य नोंदणीसाठी पुढाकार घेऊन जास्ती जास्त सदस्याची नोंद झाली पाहीजे यासाठी प्रयत्न करावे तसेच या पुढे कुठल्याही निवडणूकीत तडजोड किवा गैरप्रकार होणार नाही मी भाजप सदस्याच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहणार आहे.मागील काळात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे .या पुढेही विकास सुरूच राहणार आहे येणा-या निवडणूकीच्या अनुषंगाने आता पासुनच तयारीला लागा असे कानमंत्र आ.राजेश पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.
व पुढे बोलताना म्हणाले की भाजप कार्यकर्त्यांनी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या जनते पर्यत पोहचुन तुम्ही लाभ घ्या या पुढे कोणत्या गावात मी येणार आहे. एक दिवस अगोदर भाजप कार्यकर्त्यांना निरोप देण्यात येईल. भाजप सदस्य नोंदणी जास्ती जास्त करून आपला तालुका मतदार संघ मराठवाडय़ात प्रथम आला पाहीजे असे आवाहन आ.राजेश पवार यांनी केले .
यावेळी सुर्याजी पा.चाडकर, माजी सरपंच बालाजी मदेवाड , श्रीहरी देशमुख, तालुकाध्यक्ष दत्ता पा.ढगे , बाबासाहेब पा.हंबर्डे, शहराध्यक्ष माधव पा.कल्याण, व्यंकटराव पा.राहेरकर , राहुल पा.नखाते , सरपंच रंजित पा.कुरे , राजु बेळगे , शिवा पा.गडगेकर, आवकाश पा.धुप्पेकर, धनजय पा.जाधव, राहुल शिंदे, प्रकाश पा.हेन्डगे, शिवाजी पा.पळसगावकर , सोपान पाटील , उपसरपंच नागेश पा.काहाळेकर, युवराज लालवंडीकर, गजानन जाधव , परमेश्वर जाधव, सौ नरवाडे आदि जण उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy