मन्याड नदीपात्रातुन काळ्या वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी सर्रास गाढवांचा वापर.

(बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
बिलोली व देगलूर दोन्ही तालुक्याच्या मध्यभागीअसलेल्या मन्याड नदीपात्रातुन गेल्या अनेक दिवसांपासून आळंदी, वझरगा आणि खतगांव या मन्याड नदी पात्रातून काळ्या वाळूची वाहतूक करण्यासाठी सर्रास गाढवांच्या साह्याने हजारो ब्रास काळ्या वाळूची वाहतूक करताना दिसून येत आहे.

सदर मन्याड नदीपत्रातून काळे वाळूची वाहतूक गाढवांच्या साह्याने अवैध वाहतूक केली जाते, तरी ही महसूल प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का? असा जनतेतून सूर निघत आहे.
नदीपात्रातून दीडशे ते दोनशे गाढवांचा वापर करून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध पद्धतीने काळ्या वाळूची चोरी केली जात आहे, तर दुसरीकडे वाळूचे दर गगनाला भिडल्यामुळे सामान्य नागरिकांना वाळू खरेदी करणे व घर बांधणे मोठे कठीण झाले आहे.
 गाढवावर काळ्या वाळूची अवैध वाहतूक बाबीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून शासनाने वेळीच लक्ष देऊन या काळ्या वाळूच्या वाहतुकीवर कार्यवाही करून शासनाचे महसूल वाचवतील की नाही?  महसुल प्रशासकीय अधिकारी व त्या भागातील तलाठी , मंडळ अधिकारी यांच्याकडे जनतेचं लक्ष लागून आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या