गरीब व होतकरू साठी चादर वाटप; नमोस्तुते समर्पन संस्कृति प्रतिष्ठान नांदेड़ चा स्तुत्य उपक्रम !

( गोविंद बिरकूरे )
नमोस्तुते समर्पन संस्कॄती प्रतिष्ठान, नांदेड़ या संस्थेमार्फत शासकीय रुग्णालयाबाहेर गाव खेड्यातून आलेल्या गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, शहरातील गरीब व गरजु लोकांना चादर वाटप नांदेड शहरातील अनेक भागात करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक अनेकांनी केले आहे. संस्थेच्या वतीने बरेच सामाजिक उपक्रम गरीब व होतकरूंसाठी राबविण्यात येतात.

यंदा थंडी जास्त असल्याणे हिंगोली गेट, आण्णा भाऊ साठे चौक, जुना मोढा, बालाजी मंदिर, शनि मंदिर, लातुर फाटा, चंदासिंग चौक, गणेशनगर, तरोडा नाका, विष्णुपुरी व शहरातील अनेक भागातील गरीब व गरजू होतकरू यांना या हिवाळ्यात चादर वाटप करण्याचे कार्य या संस्थे मार्फत करण्यात आले.

संस्थापक अमोल कुल्थिया, संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ऐन हिवाळ्यात थंडी पासुन बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप केल्यानं अनेकांच्या डोळ्यात आंनद अश्रु आले. या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले. ह्या उपक्रमाला गति देण्यासाठी सराफा बाजारातील बऱ्याच व्यापा-यांनी पुढाकार घेतला आहे.

www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या