मौजे गंजगाव येथील गरजु लोकांना आम्मा-नाना ट्रस्टच्या वतीने शॉल वाटप.

(बिलोली ता.प्र.सुनिल जेठे )
ऐन कडक हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढले आहे. वयोवृध्द महिला,  गरजु लोकांना आम्मा-नाना ट्रस्टच्या वतीने शॉल वाटप करण्याचा उपक्रम दर वर्षी राबवल्या जात असतो. या ही वर्षी आम्मा-नाना ट्रस्टचे चेअरमन श्री.व्यंकटेशराव येलूरे (वासू अन्ना)  आपल्या हस्ते गरजु लोकांना गरम शाॕल वापट करण्यात आले.

श्री.व्यंकटेशराव येलूरे (वासू अन्ना) हे तेलंगना राज्यातील कोटगीर येथे हा उपक्रम राबवल्या नंतर महाराष्ट्रातील ग्रामीण गावातील गरजु लोकांना दर वर्षी आपल्या आम्मा-नाना ट्रस्ट वतीने शॉल वाटप करतात.
म्हणून आपल्या हस्ते गरजु लोकांना शॉल वाटप केलेल्या लोकांना थंडी ची जानीव होऊ नये त्यांना गरम शाॕलीत झोप चांगली लागली तर श्री.व्यंकटेशराव येलूरे (वासू अन्ना) यांच्या मनाला  समाधान वाटतं असे म्हणाले.
गंजगाव ग्राम पंचायतचे विकास कामांची व कौतुकास्पद कार्या माहिती मिळाली असल्यामुळे श्री.व्यंकटेशराव येलूरे(वासू अन्ना) यांनी गंजगाव चे सरपंच प्र. हाणमंत पाटील कनशेट्टे यांचे अभिनंदन करुन पुढील विकास कामे करण्यासाठी वासू अन्नांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ट्रस्ट चेअरमन श्री.व्यंकटेशराव येलूरे (वासू अन्ना), गंजगावचे सरपंच प्रतिनिधी  हनमंतराव पा कनशेट्टे, उपसरपंच बसवंत बावलगावे, गंजगाव सोसायटी चेअरमन मानिक पा.बासरे, बसवंत यनपवार, माधवराव शिवशेट्टे, बसवंत पा मलिपटिल, मारोती घाटे, गंगाधर जाधव, सुभाष गायकवाड यांची उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या