आयसीआरपीचे मानधन लवकरच होणार, गटविकास अधिकारी वांजे यांचे आश्वासन 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगांव तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एम.एस. आर.एल.एम.विभागामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानात ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या आयसीआरपी अर्थात समूह संसाधन व्यक्तीचे मानधन गेल्या 11 महिन्यापासून झाले नव्हते या मानधनासाठी ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन गटविकास अधिकारी आर एल वाजे यांना एक निवेदन देऊन लवकर पगार करण्यात यावी असे लेखी निवेदनाद्वारे सांगितले.
गटविकास अधिकारी आर एल वांजे यांनी सीआरपीच्या महीलां यांची मागणी मान्य करून त्यांचे निवेदन घेऊन चार दिवसात दहा महिन्याचे मानधन देण्यात येईल अशी माहिती दिल्यामुळे आयसीआरपी यांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत प्रत्येक गावांमध्ये बचत गट तयार करून त्यांना विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून त्यांची बैठका घेऊन समूह संसाधन व्यक्ती मोठमोठे काम करत असतात मात्र त्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन तेही दहा अकरा अकरा महिने मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती .
या उपासमारीच्या वेळेमध्ये त्यांना कोणी साथही द्यायला तयार नव्हते मात्र सर्व महिलांनी एकत्र येऊन संघटना तयार करून अर्ज पंचायत समिती नायगाव यांना देऊन दहा-अकरा महिन्याचे मानधन लवकर करण्यात येईल असे आश्वासन गटविकास अधिकारी वाजे यांनी दिले आहे. यावेळी नायगाव आय सी आर पी संघटना अध्यक्ष रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर, उपाध्यक्ष महानंदा गायकवाड नायगाव, संगीता जाधव नरसी, काशिबाई वडजे टेंभूर्णी, आफरिन शेख मांजरम, सोनुताई वाघमारे परडवाडी, सोनाली पेदे शेळगाव छत्री, विद्यादेवी कदम पाटोदा, सोनाली गंजेवार बरबडा, पदमिन गोजेगावे भोपाळा, राधा शिंदे टेंभुर्णी, दैवशिला वाघमारे शेळगाव गौरी, आदि महिलांची निवेदन देण्यात आलेल्या वेळी उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या