गटशिक्षणाधिकारी कार्यालयातच भरवली विद्यार्थ्यांची शाळा ;

शाळेतील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता. शिक्षण विभागाने येत्या आठवडाभरात दुसर्या शिक्षकाची नेमणूक करावी,अन्यथा सर्व गावर्यांच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. –                         ब्रम्हानंदा भुते सरपंच,कावलगुडा बुद्रुक 
याबाबत वरिष्ठांना माहीती देण्यात आली आहे. शिक्षक मिळण्यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शिक्षक मिळताच कावलगुडा बुद्रुक येथे नियुक्ती देण्यात येईल.नंदकुमार कुलकर्णी.
[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
तालुक्यातील जिल्हा परिषद कावलगुडा येथील जिल्हा परिषद शाळेत एकाच शिक्षकावर शाळा चालू असुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या मागणीसाठी येथील पालकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गुरुवारी शाळा भरवली.
 या शाळेत गेल्या मार्च महिन्यापासुन एकशिक्षकी शाळा चालू असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.येथे पहिली ते चौथीपर्यंत वर्ग सुरू असुन विद्यार्थिसंख्या 39 एवढी आहे. या शाळेत शिक्षकांच्या दोन पदांची मंजुरी असुन सद्या एकाच शिक्षकावर शाळा चालू आहे.
एक शिक्षकाचे पद मार्च महिन्यापासुन रिक्त आहे. विद्यार्थांचे होत असल्याने शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पालकांनी गुरुवारी सका़ळी शाळेतील विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आणुन शाळा भरविली. यावेळी गावातील सामाजीक कार्यकर्ते बाबुराव भुते, शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर दुगाडे, प्रल्हाद दुगाडे, अनिल भुते, दत्ताहरी ताटे, प्रकाश ताटे, साईनाथ रोडेकर, आदी उपस्थिति होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या